Saturday, October 24, 2020


सर्वापूर्वमियं येषामासीत् कृत्स्ना वसुंधरा ।
प्रजापतिमुपादाय नृपाणां जयशालिनाम् ॥ १ ॥

येषां स सगरो नाम सागरो येन खानितः ।
षष्टिः पुत्रसहस्राणि यं यान्तं पर्यवारयन् ॥ २ ॥

इक्ष्वाकूणामिदं तेषां राज्ञां वंशे महात्मनाम् ।
महदुत्पन्नमाख्यानं रामायणमिति श्रुतम् ॥ ३ ॥

पूर्वकाली प्रजापति मनुपासून आत्तापर्यंत ही सर्व पृथ्वी ज्या वंशाच्या विजयशाली नरेशांच्या अधिकारात राहिली आहे; ज्यांनी समुद्र खणून काढला होता आणि जे प्रवासात साठ हजार पुत्र घेरून चालत असत ते महाप्रतापी राजा सगर ज्या कुळात उत्पन्न झाले होते त्याच इक्ष्वाकुवंशीय महात्मा राजांच्या कुलपरंपरेमध्ये रामायण नावाने प्रसिद्ध या महान् ऐतिहासिक काव्याचे अवतरण झाले. ॥ १-३ ॥
तदिदं वर्तयिष्यावः सर्वं निखिलमादितः ।
धर्मकामार्थसहितं श्रोतव्यमनसूयता ॥ ४ ॥
आम्ही दोघे आदिपासून अंतापर्यंत या सार्‍या काव्याचे पूर्णरूपाने गान करू. याच्या द्वारा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चारही पुरुषार्थांची सिद्धि होते; म्हणून आपण सर्व दोष दृष्टिचा परित्याग करून याचे श्रवण करावे. ॥ ४ ॥
कोशलो नाम मुदितः स्फीतो जनपदो महान् ।
निविष्टः सरयूतीरे प्रभूतधनधान्यवान् ॥ ५ ॥
कोशल नामक एक फार मोठे प्रसिद्ध जनपद आहे, जे शरयू नदीच्या किनार्‍यावर वसलेले आहे. ते प्रचुर धनधान्यांनी संपन्न, सुखी आणि समृद्धशाली आहे. ॥ ५ ॥
अयोध्या नाम नगरी तत्रासील्लोकविश्रुता ।
मनुना मानवेन्द्रेण या पुरी निर्मिता स्वयम् ॥ ६ ॥
त्या जनपदात अयोध्या नावाची एक नगरी आहे, जी समस्त लोकात विख्यात आहे. ती पुरी स्वयं महाराज मनुने बनविली आणि वसविली होती. ॥ ६ ॥
आयता दश च द्वे च योजनानि महापुरी ।
श्रीमती त्रीणि विस्तीर्णा सुविभक्तमहापथा ॥ ७ ॥
ही शोभासंपन्न महापुरी बारा योजने लांब आणि तीन योजने रूंद होती. तेथून बाहेरच्या जनपदास जाण्याचा जो विशाल राजमार्ग होता, तो उभय पार्श्वभागी विविध वृक्षवल्लींनी विभूषित असल्यामुळे सुस्पष्टतया अन्य मार्गाहून वेगळा कळून येत होता. ॥ ७ ॥
राजमार्गेण महता सुविभक्तेन शोभिता ।
मुक्तपुष्पावकीर्णेन जलसिक्तेन नित्यशः ॥ ८ ॥
सुंदर विभागपूर्ण बनविलेला तो महान राजमार्ग त्या पुरीची शोभा वाढवित होता. त्यावर फुललेली फुले विखुरली जात असत आणि प्रतिदिन त्यावर जलाचे सडे शिंपले जात असत. ॥ ८ ॥
तां तु राजा दशरथो महाराष्ट्रविवर्धनः ।
पुरीमावासयामास दिवि देवपतिर्यथा ॥ ९ ॥
ज्याप्रमाणे स्वर्गात देवराज इंद्राने अमरावती पुरी वसविली होती त्याचप्रमाणे धर्म आणि न्यायाच्या बलाने आपल्या महान राष्ट्राची वृद्धि करणार्‍या राजा दशरथांनी अयोध्यापुरीला पहिल्यापेक्षाही विशेष रूपाने वसविले होते. ॥ ९ ॥
कपाटतोरणवतीं सुविभक्तान्तरापणाम् ।
सर्वयन्त्रायुधवतीमुषितां सर्वशिल्पिभिः ॥ १० ॥
ती पुरी मोठमोठ्या फाटकांनी आणि तोरणांनी सुशोभित झालेली होती. तिच्यामध्ये पृथक् पृथक् बाजार होते. तेथे सर्व प्रकारची यंत्रे आणि अस्त्र शस्त्र संचित केलेली होती. त्या पुरीत सर्व कलांचे शिल्पी निवास करीत होते. ॥ १० ॥
सूतमागधसम्बाधां श्रीमतीमतुलप्रभाम् ।
उच्चाट्टालध्वजवतीं शतघ्नीशतसङ्‍कुलाम् ॥ ११ ॥
स्तुतिपाठ करणारे सूत आणि वंशावळीचे वर्णन करणारे मागध तेथे होते. ती पुरी सुंदर शोभेने संपन्न होती. तिच्या शोभेची कशाशीही तुलना करणे शक्य नव्हते. तेथे उंच उंच अट्टालिका (गच्ची) होत्या, ज्यांच्यावर ध्वज फडकत होते. शेकडो तोफांनी ती पुरी व्याप्त होती. ॥ ११ ॥
वधूनाटकसङ्‍घैश्च संयुक्तां सर्वतः पुरीम् ।
उद्यानाम्रवणोपेतां महतीं सालमेखलाम् ॥ १२ ॥
त्या पुरीमध्ये अशी बरीच नाटक मंडळे होती ज्यात केवळ स्त्रियाच नृत्य आणि अभिनय करीत असत. त्या नगरीत चारही बाजूला उद्यान आणि आमराया (आंबाच्या बागा) होत्या. लांबी रूंदीच्या दृष्टीने ती पुरी खूप विशाल होती आणि साल वृक्षांनी घेरलेली होती. ॥ १२ ॥
दुर्गगम्भीरपरिखां दुर्गामन्यैर्दुरासदाम् ।
वाजिवारणसम्पूर्णां गोभिरुष्ट्रैः खरैस्तथा ॥ १३ ॥
तिच्या चारी बाजूस खोल खंदक खणलेले होते, ज्यांच्यात प्रवेश करणे किंवा ज्यांना ओलांडणे अत्यंत कठीण होते. ती नगरी इतरांसाठी सर्वथा दुर्गम आणि दुर्जय होती. घोडे, हत्ती, गाय, बैल, ऊंट आणि गाढवे आदि उपयुक्त पशुंनी ती भरलेली होती. ॥ १३ ॥
सामन्तराजसङ्‍घैश्च बलिकर्मभिरावृताम् ।
नानादेशनिवासैश्च वणिग्भिरुपशोभिताम् ॥ १४ ॥
कर देणार्‍या सामंत नरेशांचा समुदाय तिला सदा घेरून राहात असे. विभिन्न देशातले व्यापार करणारे निवासी (वैश्य) त्या पुरीची शोभा वाढवित होते. ॥ १४ ॥
प्रासादै रत्‍नविकृतैः पर्वतैरिव शोभिताम् ।
कूटागारैश्च सम्पूर्णामिन्द्रस्येवामरावतीम् ॥ १५ ॥
तेथील प्रासादांची निर्मिती नाना प्रकारच्या रत्‍नांनी केलेली होती. ते गगनचुंबी प्रासाद पर्वताप्रमाणे भासत होते. त्यांच्यामुळे त्या पुरीला मोठी शोभा आली होती. अनेक कूटागारांनी (गुप्तगृहांनी अथवा स्त्रियांच्या क्रीडाभवनांनी) परिपूर्ण असलेली ती नगरी इंद्राच्या अमरावती प्रमाणे वाटत होती. ॥ १५ ॥
चित्रामष्टापदाकारां वरनारीगणायुताम् ।
सर्वरत्‍नसमाकीर्णां विमानगृहशोभिताम् ॥ १६ ॥
तिची शोभा विचित्र होती. तिच्या महालांवर सोन्याचे पाणी चढविलेले होते. (अथवा ती पुरी** द्युतफलकाच्या आकारात वसविली गेली होती). श्रेष्ठ आणि सुंदर स्त्रियांचे समूह त्या नगरीची शोभा वाढवित होते. ती सर्व प्रकारच्या रत्‍नांनी भरलेली आणि सात मजली प्रासादांनी सुशोभित होती.
॥ १६ ॥ [**गोविंदराज यांच्या टीकेत अष्टपदाचा अर्थ सारीपाट अथवा ज्यावर फासे फेकून द्यूत खेळला जातो तो द्युतफलक असा केला गेला आहे. पुरीच्या मध्यभागी राजमहाल होता. त्याच्या चारी बाजूस राजमार्ग होते आणि मधे मोकळी जागा होती, त्यामुळे तो भाग द्यूतफलकासमान भासत होता.]
गृहगाढामविच्छिद्रां समभूमौ निवेशिताम् ।
शालितण्डुलसम्पूर्णामिक्षुकाण्डरसोदकाम् ॥ १७ ॥
पुरवासी जनांच्या संख्येमुळे वस्ती इतकी दाट झाली होती की कोठेही थोडीदेखील मोकळी जागा दिसत नव्हती. ही नगरी समतल भूमीवर वसलेली होती. ती नगरी साळीच्या भाताच्या पिकांनी परिपूर्ण होती आणि तेथील जल इतके गोड व स्वादिष्ट होते की जणु उसाचा रसच होय. ॥ १७ ॥
दुन्दुभीभिर्मृदङ्‍गैश्च वीणाभिः पणवैस्तथा ।
नादितां भृशमत्यर्थं पृथिव्यां तामनुत्तमाम् ॥ १८ ॥
भूमंडलावरील ती सर्वोत्तम नगरी दुंदुभि, मृदंग, वीणा, पणव आदि वाद्यांच्या मधुर ध्वनीने अत्यंत गुंजत राहात असे. ॥ १८ ॥
विमानमिव सिद्धानां तपसाधिगतं दिवि ।
सुनिवेशितवेश्मान्तां नरोत्तमसमावृताम् ॥ १९ ॥
देवलोकातील तपस्येने प्राप्त झालेल्या सिद्धांच्या विमानाप्रमाणे या पुरीला भूमंडलावरील सर्वोतम स्थान प्राप्त झाले होते. तेथील सुंदर महाल अत्यंत उत्तम रीतीने बनविले आणि वसविले झाले होते. त्यांचे आतील भाग फारच सुंदर होते. अनेक श्रेष्ठ पुरुष त्या नगरीत वास करीत होते. ॥ १९ ॥
ये च बाणैर्न विध्यन्ति विविक्तमपरापरम् ।
शब्दवेध्यं च विततं लघुहस्ता विशारदाः ॥ २० ॥

सिंहव्याघ्रवराहाणां मत्तानां नदतां वने ।
हन्तारो निशितैः शस्त्रैर्बलाद् बाहुबलैरपि ॥ २१ ॥

तादृशानां सहस्रैस्तामभिपूर्णां महारथैः ।
पुरीमावासयामास राजा दशरथस्तदा ॥ २२ ॥
जो आपल्या समूहापासून दुरावून असहाय झाला आहे, ज्याला मागेपुढे कुणी नाही (अर्थात जो पिता आणि पुत्र या दोन्हीच्या विरहित आहे) आणि जो शब्दवेधी बाणद्वारा वेधण्यास योग्य आहे, अथवा जो युद्धात हरून पळून जात आहे, अशा पुरुषांवर जे लोक बाणांचा प्रहार करीत नाहीत; ज्यांचे अभ्यस्त हात शीघ्रतापूर्वक लक्ष्यवेध करण्यात समर्थ आहेत; अस्त्र-शस्त्रांच्या प्रयोगात ज्यांना कुशलता प्राप्त आहे, तसेच वनात गर्जना करणार्‍या मदोन्मत्त सिंह, व्याघ्र आणि डुकरांना तीक्ष्ण शस्त्रांनी तसेच भुजांच्या बळावर बलपूर्वक मारून टाकण्यास जे समर्थ आहेत अशा हजारो महारथी वीरांनी अयोध्या पुरी परिपूर्ण आहे. तिला महाराज दशरथांनी वसविले आहे आणि तिचे पालन केले आहे. ॥ २०-२२ ॥
तामग्निमद्‌भिर्गुणवद्‌भिरावृतां
     द्विजोत्तमैर्वेदषडङ्‍गपारगैः ।
सहस्रदैः सत्यरतैर्महात्मभि-
     र्महर्षिकल्पैर्ऋषिभिश्च केवलैः ॥ २३ ॥
अग्निहोत्री, शम, दम आणि उत्तम गुणांनी संपन्न, तसेच सहा अंगांसहित संपूर्ण वेदांत पारंगत विद्वान श्रेष्ठ ब्राह्मण या पुरीला सदा घेरून राहात असत. ते (राजा दशरथ) सहस्रांचे दान करणारे आणि सत्यात तत्पर राहणारे होते; अशा महर्षिकल्प महात्म्यांनी आणि ऋषींनी अयोध्यापुरी सुशोभित होती, तथा राजा दशरथ तिचे रक्षण करीत होते. ॥ २३ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे पञ्चमः सर्गः ॥ ५ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा पाचवा सर्ग समाप्त झाला. ॥ ५ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

 

Friday, August 28, 2020

९) भरतमुनी व नाट्यशास्त्र




 भारतात नाटकांची परंपरा किती प्राचीन आहे ते आपण मागच्या भागात पाहिले. आज आपण भरतांनी लिहिलेल्या नाट्यशास्त्राची माहिती घेणार आहोत.

छंदशास्त्र, गणितशास्त्र, व्याकरणशास्त्र, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, स्थापत्यशास्त्र, साहित्यशास्त्र, असे अनेक विषयांवर संस्कृतभाषेत शास्त्रीय ग्रंथ लिहीले गेले आहेत. नाट्यशास्त्र हे साहित्यशास्त्रातच समाविष्ट होते.
भरतमुनींनी लिहिलेला नाट्यशास्त्र हा ग्रंथ साहित्यशास्त्रातील अतिशय प्राचीन ग्रंथ आहे. भरतांच्या नाट्यशास्त्रात कोहल, शांडिल्य, वात्स्य, धूर्तिल वगैरे अन्य आचार्यांचा उल्लेख मिळतो. पण त्यांचे ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे भरतांनाच नाट्यशास्त्राचे प्रधान आचार्य मानले जाते. कदाचित त्याकाळात उपलब्ध असलेल्या सर्व मतांचा विचार करूनच नाट्यशास्त्र या विस्तृत ग्रंथाचे लेखन भरतांनी केले असल्यामुळे भरतांचा ग्रंथ व नाव लोकप्रिय झाले असावे. कारण हा ग्रंथ नाट्यशास्त्राविषयी परिपूर्ण माहिती देणारा व विशाल ग्रंथ आहे.
संस्कृत साहित्यिक आपला परिचय ग्रंथामधून देत नाहीत. एकंदर सर्व संस्कृत साहित्यक प्रसिद्धी-पराङ्मुखच आहेत. सहाजिकच संस्कृत साहित्यिकांचा काळ, त्यांची वैयक्तिक माहिती, त्यांचे कार्य याविषयी इतर ग्रंथकारांनी दिलेल्या माहितीवरूनच आणि त्यांचे उपलध असलेले ग्रंथ यावरूनच माहिती गोळा करावी लागते.
परंपरेप्रमाणे भरतमुनी हे नाट्यशास्त्राचे प्रणेते आहेत. ही गोष्ट सर्वांनी मान्य केली आहे. पुराणे वगैरे प्राचीन साहित्यात अनेक भरतांचा उल्लेख मिळतो. १) दशरथपुत्र भरत २) दुष्यंत-शकुंतलेचा पुत्र भरत की ज्यांच्या नावावरूनच आपल्या देशाला भारत हे नाव मिळालेले आहे. ३) मान्धाताचा पणतु भरत ४) जडभरत. हे सर्व भरत कोणत्या ना कोणत्या तरी राजवंशाशी संबंद्ध आहेत. त्यापैकी कोणीही नाट्यशास्त्राचा प्रणेता नसावा. नाट्यशास्त्र लिहिणारे भरत ही एक वेगळीच ऐतिहासिक व्यक्ति असावी. (काहींच्या मते भरत हे एका जातीचे नाव असावे. नाट्यशास्त्र त्यांच्या जातीय कलेचा प्रतिपादक ग्रंथ असावा. आणि त्याची रचना अनेक भरतांनी वेळोवेळी केलेली असावी). एकूण भरतांच्याविषयी कोणतीही वैयक्तिक माहिती उपलब्ध नाही. (नाट्यशास्त्रकार भरतांचा मत्स्यपुराणाव्यतिरिक्त कुठल्याही पुराणाने त्यांचे स्मरण केलेले नाही).

नाट्य़शास्त्रग्रंथाचा काळ -
कालिदासाने ‘विक्रमोर्वशीयम्’ नाटकात भरतमुनींचा स्पष्ट उल्लेख केला आहे. कालिदासाचा काळ इ. स. चे पहिले शतक ते चौथे शतक यामधे मानला जातो. कालिदासाच्या काळीच भरत हे एक पौराणिक व्यक्ति म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे नाट्यशास्त्राचा काळ इ. स. पूर्व २ रे वा ३ रे शतक मानला जात असला तरी ते त्याहूनही प्राचीन असण्याची शक्यता आहे. कारण नाट्यशास्त्राची भाषा सूत्रमय आहे. या सूत्रशैलीवरून त्या ग्रंथाची अतिप्राचीनता सिद्ध होते. त्यावरून काही विद्वान त्याचा काळ इ. स. पूर्व पाचवे शतक मानतात.

भरतांनी लिहिलेल्या ग्रंथावरून ही गोष्ट सिद्ध होते की भरतांच्या काळीच नाटक विकसित अवस्थेत होते. तोपर्यंत नाट्यशास्त्रावर अनेक आचार्यांनी ग्रंथही लिहीले होते. म्हणजे भरतांनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहीला व त्यानंतर नाटकप्रणाली चालू झाली असे झालेले नाही. नाट्यशास्त्रात जे नटी, नृत्य, वाद्य, संगीत, संवाद, कथावस्तु, रंगमंच यांचे जे उल्लेख आलेले आहेत त्यावरूनच भरतांच्या काळी नाटक विकसित अवस्थेत होते हे दिसून येते.
नाट्यशास्त्रानुसार भरतमुनींनी नाट्यशास्त्र लिहीले व आपल्या १०० मुलांना ते शिकवले. पुढे यातील अनेक मुलांनी नाट्यशस्त्रविषयक ग्रंथाची रचना केली.

नाट्यशास्त्रीय विवरणावरून असे दिसते की भरतमुनींचा आश्रम हिमालय पर्वतावर असावा. हिमालय पर्वतावर असणार्‍या भगवान शंकरांच्या आदेशावरून त्यांनी तांडवनृत्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे. तसेच त्यांनी शंकरांसमोर त्रिपुरदाह नावाच्या नाटकात ते तांडवनृत्य सादर केले. त्यांच्या या ग्रंथात हिमलय पर्वताचे व शिव-पार्वतीच्या तांडवनृत्याचे मनोहर वर्णन आहे. त्यावरून ते हिमालयवासी असावेत असे अनुमान काढता येते. काही आलोचकांच्या मताप्रमाणे नाट्यशास्त्रात आलेल्या हिमालयातील वृक्षांच्या वर्णनावरून ते काश्मिरनिवासी असावेत.. हे सिद्ध करण्याकरता एक तर्क प्रस्तुत केला जातो की काशिमरमधे नाट्यशास्त्राचे परंपरागत अध्ययन सर्वात जास्त प्रमाणात होत आले आहे. नाट्यशास्त्रावर टीकाग्रंथ लिहिणारे लोल्लट, भट्टनायक, अभिनवगुप्त हे काश्मिरीपंडितच होते.
कालिदासाने भरतमुनींचा उल्लेख नाट्यशास्त्राचे आचार्य असा केला आहे. दामोदर गुप्त, बाण, दंडी यांच्या काळी जे नाट्यशास्त्राचे स्वरूप होते तेच स्वरूप आजही विद्यमान आहे. साधारण बाणाचा काळ इ. स. सातवे शतक मानला जातो आणि नाट्यशास्त्राचे स्वरूप त्यावेळपासून आजही तसच टिकून आहे.

नाट्यशास्त्राची निर्मिती -
भरतमुनी म्हणतात की स्वायंभव मनूचे सत्य युग उलटून गेल्यावर वैवस्वत मनूचे त्रेतायुग आले. या युगात सर्व समाज काम-क्रोधादि व्यसनांनी पोखरला गेला होता. तेव्हा सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले व त्यांनी पृथ्वीवरील दुरवस्थेची कहाणी ब्रह्मदेवाला ऐकवली. या जंबूद्वीपातील लोकांना सुखाची प्राप्ती व्हावी, त्यांनी सदाचरणी बनावे, सर्व वर्णातील लोकांना एकेठिकाणी बसून त्यांना आनंद प्राप्त व्हावा असा एखादा उपाय योजण्याची विनंती केली. तेव्हा ब्रह्मदेवाने देवतांची इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन देवतांना स्वस्थानी पाठवून दिले. नंतर ब्रह्मदेवांने चारही वेदांचे चिंतन केल्यावर त्यांना पाचवा नाट्यवेद निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी ऋग्वेदातून पाठ्य, सामवेदातून गायन, यजुर्वेदातून अभिनय व अथर्ववेदातून रस घेऊन ५ व्या नाट्यवेदाची निर्मिती केली. देवतांमधे या नाट्यवेदाचा प्रचार करण्यास त्यांनी इंद्राला सांगितले. परंतु देवतालोक नाट्य कर्मात कुशल नाहीत. वेदांचे मर्म जाणणारे मुनीलोकच या नाट्यवेदाचे ग्रहण करण्यास व प्रयोग करण्यास समर्थ आहेत, असे इंद्राने ब्रह्मदेवाला उत्तर दिले. म्हणून ब्रह्मदेवांनी भरतमुनींना हा पंचमवेद दिला व त्याचा प्रसार करण्यास सांगितले. ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार भरतमुनींनी ह्या ५ व्या नाट्यवेदाचे शिक्षण आपल्या १०० मुलांना दिले .
भरतमुनींनी ह्या नाट्यवेदाचा भार स्वीकारल्यानंतर स्त्रीपात्रांसाठी अनिंद्यसुंदर अप्सरांची योजना केली. रंगशाळेची जबाबदारी विश्वकर्म्यावर सोपवली. सर्व सामग्रीने सुसज्जित होऊन ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांनी त्यांना इंद्राच्या ध्वजोत्सवात या नाट्यवेदाचा सर्वप्रथम प्रयोग करण्यची विनंती केली. त्याप्रमाणे प्रथम त्यांनी इंद्रविजय नाटक सादर केले. या प्रयोगात देवांचा विजय व दानवाचा पराजय दाखवलेला पाहून देव प्रसन्न झाले व त्यांनी त्यांना बक्षिसे दिली. पण दानव क्रुद्ध झाले व नाटकात विघ्ने निर्माण करू लागले. म्हणून इंद्राने दानवांना प्रत्युत्तर दिले व नाट्यगृह बनवण्याची विश्वकर्म्याला आज्ञा दिली. नाट्यगृह निर्माण झाल्यावर स्वत: ब्रह्मदेवाने तिथे देवतांची स्थापना केली. त्यामुळे नाटकातील पात्रे व नाटक दोन्हींचे दानवांच्यापासूण रक्षण होऊ लागले. ब्रह्मदेवाने दैत्यांना समजावले की नाट्यवेद सर्वांसाठी आहे. ज्याप्रमाणे ‘इंद्रविजय’ या नाटकमधे देवांचा विजय दाखवला आहे त्याप्रमाणे अन्य नाटकामधे देवांचा पराजय सुद्धा दाखवला जाऊ शकतो. ब्रह्मदेवाच्या समजावण्याने दैत्य शांत झाले. नंतर त्रिपुरदाह, समुद्रमंथन ही नाटके सादर झाली.

नाट्य शब्दाची व्याखा -
योऽयं स्वभावो लोकस्य सुखदु:खसमन्वित: ।
सोऽङ्गाद्यभिनयोपेतो नाट्यत्वमित्यभिधीयते ॥१-११९॥
अर्थ - सुखदु:खमिश्रित जे लोकांचे स्वभाव असतात ते जेव्हा आंगिक वगैरे अभिनयाने सादर केले जातात तेव्हा त्याला नाट्य असे म्हणतात.

नाटकाचा उद्देश -
भरतांनी श्रव्य काव्यापेक्षा दृश्यकाव्य जे नाटक ते सर्वश्रेष्ठ मानले आहे. कारण नाटकाला सार्ववर्णिक वेद म्हटले आहे. इतर वेदांचा उपयोग फक्त द्विजांनाच आहे. परंतु नाटाकाचा आस्वाद सर्व वर्गीय लोकांना घेता येतो. नाटक सर्व प्रकारच्या लोकांचे मनोरंजन करते. कारण त्याचा विषय सीमित नसतो. त्रैलोक्यातील भावदर्शन नाटकाच्या माध्यमातून साकारता येते. नाटक शक्तिहीनांमधे शक्तीचा संचार करते. शौर्यासाठी लोकांचा उत्साह वाढवते. अज्ञानी लोकांना ज्ञान देते तर विद्वानांमधील विद्वत्तेचा उत्कर्ष होतो.
या विशाल विश्वपटावर सुखदु:खांचा खेळ चाललेला असतो. त्यामुळे मानवजीवन सुखमय किंवा दु:खमय बनते. त्या सर्वांचे चित्रण करणे हा नाटकाचा मुख्य उद्देश आहे. म्हणून भरतमुनी म्हणतात की ज्ञान, शिल्प, विद्या कला, कर्म अशी कोणतीही गोष्ट नाही की जी नाटकात दाखवली जात नाही. केवळ मनोरंजन हाही नाटकाचा उद्देश नसावा, तर मनोरंजनाबरोबर मनुष्याने चारित्र्यवान बनावे, त्याचे जीवन उदात्त बनावे यासाठी नाटकाने जागरूक असले पाहिजे.
नाटक उत्तम, अधम व मध्यम अशा सर्व प्रकारच्या लोकांचे प्रतिनिधित्व करते व त्यांच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे उपदेश करते. दु:खार्त, सुखार्त, शोकार्त, तपस्वी अशा सर्व लोकांच्या मनोरंजनाचे ते साधन असावे. त्याचबरोबर धर्म, अर्थ व काम हे तीनही पुरुषार्थ मिळवून देण्यास समर्थ असावे.

नाट्यशास्त्रातील विषय -

भारतमुनींचे नाट्यशास्त्र हा उपलब्ध नाट्यविषयक ग्रंथात प्राचीन ग्रंथ आहे. हा ग्रंथ नाट्यविषयक माहितीने परिपूर्ण ग्रंथ आहे. यात एकूण ३६ अध्याय आहेत.
१ ते १३ अध्याय़ात नाट्योत्पत्ती, अभिनय, वाद्य, नृत्य, मंडप, रंगदेवतेचे पूजन, ताण्डवलक्षण, पूर्वरंग, रसविवेचन, भावव्यंजना, अंगाभिनय, उपांगाभिनय, अशा अनेक विषयांचा ऊहापोह केलेला आहे.
१४ ते ३६ अध्यायांमधे वाचिक अभिनय, नाट्यलक्षण, छंद, अलंकार, काव्याचे गुणदोष, काकू-स्वरविधान, दशरूपक लक्षण, कथावस्तु, संधी, संध्यंग, केशिकी वगैरे वृत्ती, आहार्य अभिनय, नायक-नायिका भेद, चित्राभिनय, नाट्यप्रयोग अशा अनेक विषयांच्या सांगोपांग माहितीने भरलेला असा हा ग्रंथ आहे.

रंगमंच -
भारतीय नाटकांचे प्रयोग आरंभापासून नाट्यगृहातच होतात. कारण विश्वकर्म्यालाच नाट्यगृह रचण्याची आज्ञा केलेली आहे. भरतमुनींनी याविषयी विवरण केलेले आहे. रंगमंचाची सर्वांगीण व्यवस्था, रमणीय सज्जा, व वैज्ञानिक निर्मिती यामुळे भारतीय रंगमंच आपले स्वत:चे असे एक वैशिष्ट्य दाखवून देतो. ते वैशिष्ट्य आजही दिसून येते.
रंगमंचाचे प्राचीन नाव आहे प्रेक्षागृह किंवा रंगशाला. भरतांच्या वचनानुसार प्रेक्षागृहाच्या नाट्यमंडपाचे ३ प्रकार असतात. विकृष्ट, चतुरस्र व त्र्यस्र.
विकृष्ट प्रेक्षागृह - १०८ हात लांबीचे हे कदाचित गोलाकार असावे. हे देवतांसाठी नियत केले गेले होते.
चतुरस्र प्रेक्षागृह - हे आयताकृती असे ६४ हात लांब व ३२ हात रुंद सांगितलेले आहे. राजा व जनतेसाठी हे प्रेक्षागृह आदर्श मानले जात असे.
त्र्यस्र प्रेक्षागृह - हे त्रिकोणाकृती असे. त्याची प्रत्येक भुजा ३२ हात लांब असे. या प्रेक्षागृहाचा उपयोग छोट्या नाटकांच्या प्रयोगासाठी होत असे.

भरतांच्या मते चतुरस्र प्रेक्षागृह हे आदर्श आहे. रंगपीठावरील नटांचे संवाद व गाय़न प्रेक्षकांपर्यंत पोचले पाहिजे. त्यांचा अभिनय प्रेक्षकांना पहाता आला पाहिजे. या दोन्ही गोष्टी चतुरस्र प्रेक्षागृहात शक्य आहेत.
प्रेक्षागृहाची निर्मिती कशी करावी त्याच्या सूचना भरतमुनींनी दिल्या आहेत. प्रेक्षागृहाच्या निर्मितीला शुभमुहूर्तावर प्रारंभ करावा. भूमी समतल करावी. नांगराने नांगरून घ्यावी. चार कोपर्‍यावर चार मुख्य खांब रोवावे.
रंगशाळेचे मुख्य दोन भाग असत. अर्धा भाग प्रेक्षकांना बसण्यासाठी व उरलेल्या अर्ध्या भागात रंगशीर्ष, नेपथ्यगृह, रंगपीठ असावे. १६ हात लांब व  ८ हात रुंद असे रंगपीठ, रंगपीठाच्या मागे नेपथ्यगृह ८ हात लांब ४ हात रूंद व त्यामागे ८ हात लांब व ४ हात रुंद असे रंगशीर्ष असावे. रंगशीर्ष भागात देवी देवतांची पूजा होत असे. नेपथ्यगृहाचा वापर पात्रांच्या सजावटीसाठी होत असे. आणि रंगपीठावरून प्रत्यक्ष अभिनय सादर केला जात असे.
नाट्यगृहाचा मंडप पर्वताच्या गुहेच्या आकाराचा असावा. नाट्यमंडपाच्या भिंतीवर नाना प्रकारची चित्रे असावीत. नाट्यविषयाशी संबंधित चित्रे विशेष उपयुक्त ठरतात असे भरतांचे मत आहे. रंगशाळेची रचना विशेष हवेशीर ठिकाणी नसावी. कारण आवाज श्रोत्यांपर्यंत पोचणार नाही. प्रेक्षकांना बसण्य़ासाठी सोपानाकृती (सोपान = जिना) आसन मांडणी त्यांनी सांगितली आहे. जमिनीपासून १ हात उंच वर अशी पायर्‍यांची आसन रचना असावी. प्रेक्षागृहातील आसने वीट किंवा लाकडापासून बनवली जात असत. ‘इष्टिकादारुभि: कार्यं प्रेक्षकाणां निवेशनम्’. कुठल्याही स्थानावरून रंगमंचावरील पात्रांचा अभिनय दिसला पाहिजे. अशी प्रेक्षागृहाची रचना असवी.
अशाप्रकारे नाट्यकलेच्या प्रारंभी प्रभातकालीच सर्वांगीण व सुव्यवस्थित रूपात भारतामधे प्रेक्षागृह निर्माण झाले आहे.

नाटकाची वैशिष्ट्ये -
भरतमुनींनी नाटकाकरता काही नियम घालून दिलेले आहेत.
१) नाटक यथार्थवादी असावे. परंतु घृणास्पद अथवा उद्वेगजनक दृश्यांचे प्रदर्शन करू नये.
२) रंगपीठावर युद्ध, भोजन, स्वप्न वा प्रणय प्रसंग दाखवू नयेत.
३) एका अंकात एका मुहूर्तामधे म्हणजे साडे तीन तासात घडणार्‍या घटना दाखवाव्यात.
४) नाटक सुखांत असावे.
५) दशरूपकातील नाटक हा प्रकार ५ ते १० अंकी असावा.
६) शृंगार किंवा वीररस मुख्य असावा.
७) राजा, मंत्री, ब्राह्मण, या नटांनी संस्कृत बोलावे व राणी, नोकर व इतर स्त्रिया यांनी प्राकृत बोलावे.
८) विदूषक हास्यरस निर्मिती असला तरी नायकाला अनेक कामात मदत करणारा, नायकाचा मित्र, सर्व स्थितीत समान साथ देणारा व जातीने ब्राह्मण असावा, पण त्याने भाषा मात्र प्राकृत बोलावी.
९) नाटकाचे कथानक लोकप्रसिद्ध असावे, रामायण, महाभारत, पुराण, बृहत्कथा अशा कोणत्यातरी ग्रंथाचा कथानकाला आधार असावा. कथानक कविकल्पित असू नये. प्रसिद्ध कथानकांमधे नाटककाराने आवश्यकतेनुसार बदल करायला हरकत नाही.

नाट्यमंडपात कोणती आवश्यक कृत्ये करावीत, विभिन्न देवतांची पूजा कशी करावी, त्या पूजेचे फळ काय त्याचे सांगोपांग विवेचन त्यांनी तिसर्‍या अध्य़ायात केले आहे.
नृत्याभिनयाच्या संपूर्ण विवेचनात मुद्रा, हात, पाय, मान यांच्या स्थिती, नृत्यास वाद्याची व संगीताची जोड, नूपूर, समूहनृत्य, नृत्याचे नाटकात केव्हा केव्हा संयोजन करावे त्याविषयी माहिती दिलेली आहे.
पूर्वरंग, नांदी, प्रस्तावना, सूत्रधारप्रवेश, यांची माहिती पाचव्या अध्यायात आहे. शृंगार, करुणादी रस, स्थायी संचारी भाव, यांचेही विवरण या ग्रंथात आहे. आठव्या अध्य़ायापासून अभिनयाची माहिती आली आहे. आंगिक, वाचिक, सात्विक हे अभिनयाचे प्रकार सांगून भरतांनी आंगिक अभिनयांतर्गत येणार्‍या उपांगाभिनयाचेही विवेचन केले आहे. रंगभूमीवर प्रवेश करणार्‍या सर्व पात्रांची गती कशी असावी, चालण्याच्या गतीतून भाव कसे व्यक्त करावेत याचे सांगोपांग विवेचन केलेले आहे. निरनिराळ्या मन:स्थितीत भुवया फिरवण्याचे प्रकार, ओठ, डोळे, डोळ्यांच्या पापण्या, बुबुळे हलवण्याचे प्रकार, नासिकेचे सहा प्रकारचे अभिनय, गालांचा अभिनय, हनुवटी, उभे रहाण्याचे प्रकार, हस्तक्रियेने दाखवायचे संकेत इत्यादी सखोल माहितीने भरलेला असा हा ग्रंथ आहे. वाचिक अभिनयात स्वरोच्चारण, काकू स्वराचे विवेचन आहे. नेपथ्य, वेषभूषा, आभूषणे, स्त्री-पुरुषांनी घालायचे अलंकार, फुलांचे अलंकार यांची माहिती आहे. नकली अलंकार घालण्याची सूचना पण भारतांनी केली आहे. वेगवेगळ्या जातीच्या पात्रांची वेशभूषा, हर्ष, शोक वगैरे भाव व्यक्त करण्याच्या पद्धती, संगीत शास्त्रातील ग्राम, मूर्छना, श्रुति, स्वरांचे प्रकार, चार प्रकारची वाद्ये, बासरीचे स्वरूप, वादनविधी, ताल, लय, वादकाचे गुण, योग्यता, कोणत्या वेळी कोणते वाद्य वाजवावे वगैरेंचे सूक्ष्म विवेचन केलेले आहे.
कोणत्या प्रदेशातील लोकांनी कोणत्या प्रकारची केशरचना करावी त्याचीही माहिती आली आहे. भरत म्हणतात की गोपींनी वेणी घालावी. गौड देशातील स्त्रियांनी केस कुरळे करावेत. पूर्वेकडील व उत्तरेकडील स्त्रियांनी कपाळावरील केस कापून बाकीचे उलटे फिरवावेत, मुनिकन्यांनी एक वेणी घालावी. अप्सरा, विद्याधरी वगैरे स्त्रियांनी फणा काढलेल्या सापाप्रमाणे केशरचना करावी. यक्ष स्त्रियांनी केस मोकळे सोडावेत. अवंती देशातील स्त्रियांनी शेपूट सोडलेला अंबाडा घालावा. तर दक्षिणेकडील स्त्रियांनी खोपा घालावा.
पुरुषांनी शेंडी, टक्कल, जटा वेगवेगळ्या प्रकारच्या दाढीमिशा कशा राखाव्यात याचीही माहिती भरतांनी दिलेली आहे.
एकूण नाट्याभिनयास आवश्यक अशा सर्व अंगांनी परिपूर्ण असा हा ग्रंथ आहे.

Wednesday, April 1, 2009

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। प्रथमः सर्गः ।

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
नारदेन वाल्मीकिं प्रति संक्षेपतः श्रीरामचरित्रस्य श्रावणम् - नारदांनी वाल्मीकि मुनिंना संक्षेपाने श्रीरामचरित्र ऐकविणे -
तपः स्वाध्याय निरतं तपस्वी वाग्विदां वरम् ।
नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्‌गवम् ॥ १ ॥
तपस्वी वाल्मीकिंनी तपस्या आणि स्वाध्यायात मग्न राहणार्‍या, विद्वानात श्रेष्ठ मुनिवर नारदांना विचारले - ॥ १ ॥
को न्वस्मिन् सांप्रतं लोके गुणवान् कश्च वीर्यवान् ।
धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः ॥ २ ॥
[हे मुने !] या समयी या संसारात गुणवान्, वीर्यवान्, धर्मज्ञ, उपकार जाणणारा, सत्यवक्ता आणि दृढप्रतिज्ञ कोण आहे ? ॥ २ ॥
चारित्रेण च को युक्तः सर्वभूतेषु को हितः ।
विद्वान् कः कः समर्थश्च कश्चैक प्रियदर्शनः ॥ ३ ॥

आत्मवान् को जितक्रोधो द्युतिमान् कोऽनसूयकः ।
कस्य बिभ्यति देवाश्च जातरोषस्य संयुगे ॥ ४ ॥

एतद् इच्छाम्यहं श्रोतुं परं कौतूहलं हि मे ।
महर्षे त्वं समर्थोऽसि ज्ञातुं एवंविधं नरम् ॥ ५ ॥
चारित्र्य संपन्न, सर्व प्राण्यांच्या हितात तत्पर, विद्वान, सामर्थ्यसंपन्न, अत्यंत सुंदर, जितेंद्रिय, क्रोधावर मात केलेला, तेजस्वी, कोणाचाही मत्सर न करणारा, युद्धाच्या वेळी रागावला असता ज्याला देवही भितात, असा पुरुषोत्तम कोण आहे बरे ? हे जाणण्याची मला इच्छा आहे. नव्हे नव्हे फारच उत्सुकता आहे. हे महर्षे, असा पुरुष केवळ आपल्यालाच माहीत असणे शक्य आहे. (कारण आपण सर्वत्र संचार करणारे असून आपल्याला दिव्य दृष्टी आहे). ॥ ३-५ ॥
श्रुत्वा चैतत् त्रिलोकज्ञो वाल्मीकेः नारदो वचः ।
श्रूयतां इति चामंत्र्य प्रहृष्टो वाक्यमब्रवीत् ॥ ६ ॥
वाल्मीकिचे हे बोलणे ऐकून, 'ऐका' असे म्हणून त्रिलोकज्ञानी नारदऋषि मोठ्या आनंदाने सांगू लागले. ॥ ६ ॥
बहवो दुर्लभाश्चैव ये त्वया कीर्त्तिता गुणाः ।
मुने वक्ष्याम्यहं बुद्ध्वा तैर्युक्तः श्रूयतां नरः ॥ ७ ॥
हे मुने ! आपण जे गुण सांगितले, ते पुष्कळ असून ते सर्व एका ठिकाणी आढळणे कठीण आहे. तरीही या गुणांनी संपन्न पुरुषोत्तम मला माहीत आहे. त्याच्या विषयी मी सांगतो, ऐका. ॥ ७ ॥
इक्ष्वाकुवंश प्रभवो रामो नाम जनैः श्रुतः ।
नियतात्मा महावीर्यो द्युतिमान् धृतिमान् वशी ॥ ८ ॥

बुद्धिमान् नीतिमान् वाग्मी श्रीमान् शत्रुनिबर्हणः ।
विपुलांसो महाबाहुः कंबुग्रीवो महाहनुः ॥ ९ ॥

महोरस्को महेष्वासो गूढजत्रुः अरिंदमः ।
आजानुबाहुः सुशिराः सुललाटः सुविक्रमः ॥ १० ॥

समः समविभक्ताङ्‌गः स्निग्धवर्णः प्रतापवान् ।
पीनवक्षा विशालाक्षो लक्ष्मीवान् शुभलक्षणः ॥ ११ ॥

धर्मज्ञः सत्यसंधश्च प्रजानां च हिते रतः ।
यशस्वी ज्ञानसंपन्नः शुचिः वश्यः समाधिमान् ॥ १२ ॥

प्रजापतिसमः श्रीमान् धाता रिपुनिषूदनः ।
रक्षिता जीवलोकस्य धर्मस्य परिरक्षिता ॥ १३ ॥

रक्षिता स्वस्य धर्मस्य स्वजनस्य च रक्षिता ।
वेदवेदाङ्‍ग तत्त्वज्ञो धनुर्वेदे च निष्ठितः ॥ १४ ॥

सर्वशास्त्रार्थ तत्त्वज्ञः स्मृतिमान् प्रतिभानवान् ।
सर्वलोकप्रियः साधुः अदीनात्मा विचक्षणः ॥ १५ ॥
इक्ष्वाकुवंशात जन्मलेले असे एक पुरुष आहेत. ते लोकांत 'राम' या नावाने प्रसिद्ध आहेत. ते जितेंद्रिय, महापराक्रमी, कांतिमान, धैर्यवान, मनावर ताबा असणारे, बुद्धिमान, नीतिमान, उत्तम वक्ते, सुंदर, शत्रूंवर जय मिळवणारे आहेत. शत्रूंवर त्यांचा ताबा आहे. त्यांचे खांदे रुंद असून बाहू लांब आहेत. त्यांचे हात गुडघ्यापर्यंत पोचतात. मान शंखासारखी असून त्यांचे धनुष्य मोठे आहे. गळ्याखालच्या फासळ्या मांसल असल्याने दिसत नाहीत. मस्तक आणि कपाळ फार सुंदर आहेत. चालणे रुबाबदार आहे. त्यांची उंची यथायोग्य असून सर्व अवयव प्रमाणशीर आहेत. कांति तुकतुकीत असून वक्षःस्थल भरदार आहे. नेत्र विशाल आहेत. ते पराक्रमी असून सौंदर्यसंपन्न आहेत. त्यांच्या शरीरावर सर्व शुभ लक्षणे दिसत आहेत. ते धर्मज्ञ, सत्यप्रतिज्ञ, प्रजाहितदक्ष, कीर्तिमान, ज्ञानी, पवित्र, जितेंद्रिय आणि मन एकाग्र असणारे आहेत. प्रजापतीप्रमाणे प्रजापालक, लक्ष्मीसंपन्न, शत्रु-विनाशक, प्राण्यांचे आणि धर्माचे रक्षण करणारे आहेत. स्वधर्मपालन करणारे, स्वजनांचे रक्षण करणारे, वेद आणि वेदांगे यांचे रहस्य जाणणारे, धनुर्विद्येत पारंगत, सर्व शास्त्रांचा अर्थ व त्यांचे रहस्य जाणणारे, स्मरणशक्ति व प्रतिभा यांनी संपन्न, सर्व लोकांना प्रिय, सज्जन, उदार हृदय असणारे व चतुर आहेत. ॥ ८-१५ ॥
सर्वदाभिगतः सद्‌भिः समुद्र इव सिंधुभिः ।
आर्य सर्वसमश्चैव सदैक प्रियदर्शनः ॥ १६ ॥
नद्या जशा सागराला मिळतात, तसे सज्जन त्यांच्याकडेच येतात. ते सद्‌वर्तनी, सर्वत्र समभाव बाळगणारे असून त्यांचे दर्शन सर्वांना नेहमीच प्रिय वाटते. ॥ १६ ॥
स च सर्वगुणोपेतः कौसल्या नंदवर्धनः ।
समुद्र इव गांभीर्ये धैर्येण हिमवान् इव ॥ १७ ॥

विष्णुना सदृशो वीर्ये सोमवत् प्रियदर्शनः ।
कालाग्निसदृशः क्रोधे क्षमया पृथिवीसमः ॥ १८ ॥

धनदेन समस्त्यागे सत्ये धर्म इवापरः ।
तं एवं गुणसंपन्नं रामं सत्यपराक्रमम् ॥ १९ ॥

ज्येष्ठं श्रेष्ठगुणैर्युक्तं प्रियं दशरथः सुतम् ।
कौसल्येचा आनंद वाढविणारे ते सर्वगुणसंपन्न आहेत. समुद्रासारखे गंभीर, हिमालयासारखे धीर, विष्णूंसारखे पराक्रमी, चंद्रासारखे आल्हाददायक, क्रोध आला असता प्रळयकाळच्या अग्निसारखे, क्षमाशील पृथ्वीसारखे आणि सत्य पालनांत जणू दुसरे धर्मच असे ते आहेत. ॥ १७-१९ १/२ ॥
प्रकृतीनां हितैर्युक्तं प्रकृति प्रियकाम्यया ॥ २० ॥

यौवराज्येन संयोक्तुं ऐच्छत् प्रीत्या महीपतिः ।
तस्याभिषेक संभारान् दृष्ट्वा भार्याथ कैकयी ॥ २१ ॥

पूर्वं दत्तवरा देवी वरं एनं अयाचत ।
विवासनं च रामस्य भरतस्य अभिषेचनम् ॥ २२ ॥
अशा रीतीने सर्वगुणसंपन्न, सत्यपरक्रमी, उत्तमोत्तम गुणांनी युक्त असा आपला प्रिय ज्येष्ठ पुत्र प्रजेच्या कल्याणात तत्पर आहे असे पाहून दशरथ राजाने प्रेमाने त्याला यौवराज्याभिषेक करावयाचे ठवविले. त्याच्या अभिषेकाची तयारी चाललेली पाहून जिला राजाने पूर्वी जे काही मागेल त्यानुसार दोन वर देण्याचे मान्य केले होते त्या राणी कैकेयीने राजाकडे दोन वर मागितले. एका वराने रामास वनवास आणि दुसर्‍याने भरताचा राज्याभिषेक. ॥ १९ १/२-२२ ॥
स सत्यवचनाद् राजा धर्मपाशेन संयतः ।
विवासयामास सुतं रामं दशरथः प्रियम् ॥ २३ ॥
तो राजा सत्यवचनी असल्यामुळे धर्मबंधनात अडकला आणि त्याने आपल्या प्रिय पुत्र रामाला वनवासास पाठविले. ॥ २३ ॥
स जगाम वनं वीरः प्रतिज्ञां अनुपालयन् ।
पितुर्वचन निर्देशात् कैकेयाः प्रियकारणात् ॥ २४ ॥
ते वीर राम पित्याच्या सांगण्यावरून त्यांची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आणि कैकेयीच्या मनासारखे करण्यासाठी वनात गेले. ॥ २४ ॥
तं व्रजंतं प्रियो भ्राता लक्ष्मणोऽनुजगाम ह ।
स्नेहाद् विनयसंपन्नः सुमित्रानंदवर्धनः ॥ २५ ॥

भ्रातरं दयितो भ्रातुः सौभ्रात्रं अनुदर्शयन् ।
राम वनास जाण्यासाठी निघाल्याबरोबर सुमित्रेचा आनंद वाढविणारा, विनयशील, रामाचा लाडका भाऊ लक्ष्मण प्रेमामुळे आपल्या श्रेष्ठ बंधुत्वाचा परिचय देत त्यांच्या मागोमाग निघाला. ॥ २५-२६ १/२ ॥
रामस्य दयिता भार्या नित्यं प्राणसमा हिता ॥ २६ ॥

जनकस्य कुले जाता देवमायेव निर्मिता ।
सर्वलक्षण संपन्ना नारीणां उत्तमा वधूः ॥ २७ ॥

सीताप्यनुगता रामं शशिनं रोहिणी यथा ।
पौरैः अनुगतो दूरं पित्रा दशरथेन च ॥ २८ ॥
श्रीरामांची प्राणाहून प्रिय पत्‍नी सीता नेहमी त्यांचे हित करण्यात तत्पर असे. देवमायेनेच अवतार घेतला असे वाटणारी ती जनक कुळांतील होती. ती सर्व स्त्री लक्षणांनी संपन्न असून स्त्रियांतील सर्वोत्तम स्त्री होती. चंद्रामागोमाग रोहिणी जावी तशी तीही श्रीरामांच्या मागोमाग निघाली. त्यावेळी सर्व नागरिकांनी दूरवर जाऊन त्यांना निरोप दिला. तर पिता दशरथ यांनी आपला सारथी सुमंत्र याला रथ देऊन पाठविले. ॥ २६ १/२-२८ ॥
श्रृङ्‌गवेरपुरे सूतं गङ्‍गाकूले व्यसर्जयत् ।
गुहमासाद्य धर्मात्मा निषादाधिपतिं प्रियम् ॥ २९ ॥
नंतर श्रृंगवेरपुरात गंगेच्या काठी राहणार्‍या प्रिय निषादराज गुहाकडे पोचल्यावर धर्मशील रामांनी सारथ्याला परत पाठविले. ॥ २९ ॥
गुहेन सहितो रामो लक्ष्मणेन च सीतया ।
ते वनेन वनं गत्वा नदीः तीर्त्वा बहूदकाः ॥ ३० ॥

चित्रकूटं अनुप्राप्य भरद्वाजस्य शासनात् ।
रम्यं आवसथं कृत्वा रममाणा वने त्रयः ॥ ३१ ॥

देवगंधर्व सङ्‍काशाः तत्र ते न्यवसन् सुखम् ।
चित्रकूटं गते रामे पुत्रशोकातुरः तथा ॥ ३२ ॥

राजा दशरथः स्वर्गं जगाम विलपन् सुतम् ।
गुह, लक्ष्मण व सीता यांच्यासह श्रीराम एका वनातून दुसर्‍या वनात, या प्रमाणे निघाले. वाटेत पाण्यांनी तुडूंब भरलेल्या नद्या त्यांनी पार केल्या. गुहाला परत पाठवून जाता जाता ते भरद्वाजांच्या आश्रमत पोहोचले. भरद्वाजांच्या सांगण्यावरून ते चित्रकूट पर्वतावर गेले. देवगंधर्वाप्रमाणे असणारे ते तिघे तेथे एक सुंदर कुटी बांधून वनात रममाण होत आनंदाने राहूं लागले. ॥ ३०-३२ १/२ ॥
मृते तु तस्मिन् भरतो वसिष्ठ प्रमुखैः द्विजैः ॥ ३३ ॥

नियुज्यमानो राज्याय नैच्छद् राज्यं महाबलः ।
स जगाम वनं वीरो रामपादप्रसादकः ॥ ३४ ॥
श्रीराम चित्रकूट पर्वतावर गेल्यावर पुत्र शोकाने व्याकुळ झालेला राजा दशरथ, पुत्राची आठवणीने झुरून स्वर्गाला गेला. राजा गेल्यावर वसिष्ठादि ऋषिंनी महाबली भरताला राज्यावर बसवायचे ठरविले पण त्याला राज्यावर बसण्याची इच्छा नव्हती. म्हणून तो वीर श्रीरामांना प्रसन्न करण्यासाठी वनात गेला. ३२ १/२ -३४ ॥
गत्वा तु सुमहात्मानं रामं सत्यपराक्रमम् ।
अयाचद् भ्रातरं रामं आर्यभाव पुरस्कृतः ॥ ३५ ॥

त्वमेव राजा धर्मज्ञ इति रामं वचोऽब्रवीत् ।
रामोऽपि परमोदारः सुमुखः सुमहायशाः ॥ ३६ ॥

न चैच्छत् पितुरादेशाद् राज्यं रामो महाबलः ।
पादुके चास्य राज्याय न्यासं दत्त्वा पुनः पुनः ॥ ३७ ॥

निवर्तयामास ततो भरतं भरताग्रजः ।
स कामं अनवाप्यैव रामपादौ उपस्पृशन् ॥ ३८ ॥

नंदिग्रामेऽकरोद् राज्यं रामागमनकाङ्‍क्षया ।
गते तु भरते श्रीमान् सत्यसंधो जितेंद्रियः ॥ ३९ ॥

रामस्तु पुनरालक्ष्य नागरस्य जनस्य च ।
तत्रागमनं एकाग्रो दण्डकान् प्रविवेश ह ॥ ४० ॥
तेथे गेल्यावर त्याने सत्यपराक्रमी महात्मा बंधु रामांना प्रार्थना केली की,"दादा, आपण धर्म जाणणारे आहात. आपणच राजा व्हावे." उदार अंतःकरण असलेल्या, अत्यंत कीर्तिमान, महाबली रामांनीही वडीलांच्या आज्ञेचे पालन म्हणून प्रसन्न मुखानेच राज्य नाकारून आपल्या पादुका राजसिंहासनावर स्थापन करण्यासाठी ठेव म्हणून भरताच्या स्वाधीन करून पुन्हा पुन्हा त्याची समजूत घालून त्याला परत पाठवले. त्यामुळे त्याची इच्छा पूर्ण झाली नाही. अखेर रामचरणांना स्पर्श करून तो परतला आणि त्यांच्या येण्याची प्रतीक्षा करीत नंदिग्रामांत राहून राज्य करू लागला. भरत परत गेलावर इंद्रियनिग्रही, सत्यप्रतिज्ञ श्रीरामांनी, तेथे वारंवार आपल्याला भेटण्यासाठी लोक येत-जात राहणार, हे लक्षात घेऊन निश्चयपूर्वक दण्डकारण्यात प्रवेश केला. ॥ ३५ -४० ॥
प्रविश्य तु महारण्यं रामो राजीवलोचनः ।
विराधं राक्षसं हत्वा शरभङ्‍गं ददर्श ह ॥ ४१ ॥

सुतीक्ष्णं चाप्यगस्त्यं च अगस्त्यभ्रातरं तथा ।
अगस्त्यवचनात् चैव जग्राहैंद्रं शरासनम् ॥ ४२ ॥

खड्‍गं च परमप्रीतः तूणी चाक्षयसायकौ ।
वसतस्तस्य रामस्य वने वनचरैः सह ॥ ४३ ॥

ऋषयोऽभ्यागमन् सर्वे वधायासुर रक्षसाम् ।
स तेषां प्रतिशुश्राव राक्षसानां तथा वने ॥ ४४ ॥

प्रतिज्ञातश्च रामेण वधः संयति रक्षसाम् ।
ऋषीणां अग्निकल्पानां दण्डकारण्य वासिनाम् ॥ ४५ ॥
कमलनयन श्रीरामांनी त्या घनदाट अरण्यात गेल्यावर प्रथम विराध राक्षसाला मारले. नंतर शरभंग, सुतीक्ष्ण, अगस्त्य आणि अगस्त्यबंधू यांच्या आश्रामात जाऊन त्यांच्या आतिथ्याचा स्वीकार केला, तसेच अगस्त्य मुनिंच्या सांगण्यावरून त्यांचाकडून इंद्र-धनुष्य, तलवार आणि जाच्यातील बाण कधीच कमी होत नाहीत, असे दोन भाते मोठ्या आनंदाने घेतले. त्या वनात ऋषि व इतर लोक यांच्यासह राहात असताना तेथील सर्व अग्निसमान तेजस्वी ऋषी वनात राहणार्‍या असुरांचा व राक्षसांचा वध करण्यासाठी त्यांना विनंति करण्यासाठी आले. तेव्हां श्रीरामांनी युद्धांत राक्षसांना मारण्याचे त्यांना वचन दिले. ॥ ४१ -४५ ॥
तेन तत्रैव वसता जनस्थान निवासिनी ।
विरूपिता शूर्पणखा राक्षसी कामरूपिणी ॥ ४६ ॥
तेथेच राहात असताना त्यांनी जनस्थानात राहणार्‍या, इच्छेनुसार रूपे घेणार्‍या शूर्पणखा नावाच्या राक्षसीला (नाक-कान कापवून) कुरूप केले. ॥ ४६ ॥
ततः शूर्पणखावाक्यात् उद्युक्तान् सर्वराक्षसान् ।
खरं त्रिशिरसं चैव दूषणं चैव राक्षसम् ॥ ४७ ॥

निजघान रणे रामः तेषां चैव पदानुगान् ।
वने तस्मिन् निवसता जनस्थान निवासिनाम् ॥ ४८ ॥

रक्षसां निहतान्यासन् सहस्राणि चतुर्दश ।
ततो ज्ञातिवधं श्रुत्वा रावणः क्रोधमूर्च्छितः ॥ ४९ ॥
नंतर शूर्पणखेच्या सांगण्यावरून खर, त्रिशिरस आणि दूषण असे तीन राक्षस, चौदा हजार राक्षसांचे सैन्य घेऊन श्रीरामांवर चालून आले. त्या वनात राहणार्‍या श्रीरामांनी त्या सर्व राक्षसांचा वध केला. आपले बांधव मारले गेले हे शूर्पणखेकडून ऐकताच रागाने रावणाच्या अंगाचा तिळपापड झाला. ॥ ४७-४९ ॥
सहायं वरयामास मारीचं नाम राक्षसम् ।
वार्यमाणः सुबहुशो मारीचेन स रावणः ॥ ५० ॥
त्यावेळी मारीच नावाच्या राक्षसाकडे त्याने मदत मागितली. तेव्हां मारीचाने रावणाला अनेक प्रकारे समजावून परावृत्त करण्याचा प्रयत्‍न केला. ॥ ५० ॥
न विरोधो बलवता क्षमो रावण तेन ते ।
अनादृत्य तु तद्वाक्यं रावणः कालचोदितः ॥ ५१ ॥

जगाम सहमारीचः तस्याश्रमपदं तदा ।
तेन मायाविना दूरं अपवाह्य नृपात्मजौ ॥ ५२ ॥
"हे रावणा, आपल्याहून सामर्थ्यवान असणार्‍याशी विरोध करणे तुझ्या हिताचे नाही." हे मारीचाचे सांगणे अव्हेरून काळाच्या प्रेरनेने रावण रामाच्या आश्रमाजवळ आला. मायावी मारीचाकरवी (मृगरूप धारण करवून) त्याने राम-लक्ष्मणांना आश्रमापासून दूर नेले. ॥ ५१-५२ ॥
जहार भार्यां रामस्य गृध्रं हत्वा जटायुषम् ।
गृध्रं च निहतं दृष्ट्वा हृतां श्रुत्वा च मैथिलीम् ॥ ५३ ॥

राघवः शोकसंतप्तो विललापाकुलेंद्रियः ।
ततस्तेनैव शोकेन गृध्रं दग्ध्वा जटायुषम् ॥ ५४ ॥

मार्गमाणो वने सीतां राक्षसं संददर्श ह ।
कबंधं नाम रूपेण विकृतं घोरदर्शनम् ॥ ५५ ॥

तं निहत्य महाबाहुः ददाह स्वर्गतश्च सः ।
स चास्य कथयामास शबरीं धर्मचारिणीम् ॥ ५६ ॥

श्रमणां धर्मनिपुणां अभिगच्छेति राघव ।
सोऽभ्यगच्छन् महातेजाः शबरीं शत्रुसूदनः ॥ ५७ ॥
नंतर सीतेला पळवून नेत असता विरोध करणार्‍या जटायूला त्याने घायाळ केले. सीतेला रावणाने पळविले हे ऐकून व त्यामुळे जटायू मरण पावला हे पाहून श्रीराम शोकाकुल होऊन विलाप करू लागले. त्याच स्थितीत त्यांनी जटायूवर अग्निसंस्कार केले आणि ते सीतेच्या शोधासाठी निघाले. तेथे त्यांना डोके नसलेला कबंध नावाचा भयंकर राक्षस दिसला. पराक्रमी रामांनी त्यला मारून अग्नि दिला, तेव्हां दिव्य रूप गंधर्व होऊन तो स्वर्गाला गेला. त्यानेच श्रीरामांना सांगितले की, "हे राघवा, तुम्ही धर्माप्रमाणे वागणार्‍या संन्यासिनी शबरीकडे जा." त्याप्रमाणे शत्रुसंहारक महातेजस्वी श्रीराम शबरीकडे गेले. ॥ ५३-५७ ॥
शबर्या पूजितः सम्यक् रामो दशरथात्मजः ।
पंपातीरे हनुमता सङ्‍गतो वानरेण ह ॥ ५८ ॥

शबरीकडून पूजा स्वीकारून दाशरथी राम पंपासरोवरावर गेले. तेथे हनुमान नामक वानरश्रेष्ठाशी त्यांची भेट झाली. ॥ ५८ ॥
हनुमद्वचनाच्चैव सुग्रीवेण समागतः ।
सुग्रीवाय च तत्सर्वं शंसद् रामो महाबलः ॥ ५९ ॥

आदितस्तद् यथावृत्तं सीतायाश्च विशेषतः ।
सुग्रीवश्चापि तत्सर्वं श्रुत्वा रामस्य वानरः ॥ ६० ॥

चकार सख्यं रामेण प्रीतश्चैवाग्निसाक्षिकम् ।
ततो वानरराजेन वैरानुकथनं प्रति ॥ ६१ ॥

रामाय आवेदितं सर्वं प्रणयाद् दुःखितेन च ।
प्रतिज्ञातं च रामेण तदा वालिवधं प्रति ॥ ६२ ॥
हनुमंताच्या सांगण्यावरून महाबलवान श्रीरामांनी सुग्रीवाशी मैत्री करून त्याला आपली सुरुवातीपासून हकीकत, विशेषतः सीतेसंबंधीची वार्ता सांगितली. सुग्रीव वानरानेही ते सर्व ऐकून प्रेमपूर्वक श्रीमाशी अग्निच्या साक्षीने मैत्री केली. नंतर दुःखी वानर राजाने मित्रप्रेमामुळे श्रीरामांना वालीशी वैर उत्पन्न होण्याची सर्व हकीकत सांगितली. तेव्हां श्रीरामांनी वालीवधाची प्रतिज्ञा केली. ॥ ५९-६२ ॥
वालिनश्च बलं तत्र कथयामास वानरः ।
सुग्रीवः शङ्‌कितश्चासीत् नित्यं वीर्येण राघवे ॥ ६३ ॥

राघवप्रत्ययार्थं तु दुंदुभेः कायमुत्तमम् ।
दर्शयामास सुग्रीवो महापर्वत सन्निभम् ॥ ६४ ॥
सुग्रीवाने श्रीरामांच्या सामर्थ्याविषयी शंका वाटून वालीचे प्रचंड सामर्थ्य सांगितले, आणि श्रीरामांना त्याची खात्री पटावी म्हणून वालीने मारलेल्या दुंदुभी राक्षसाचे, मोठ्या प्रवताएवढे प्रचंड शरीर दाखविले. ॥ ६३-६४ ॥
उत्स्मयित्वा महाबाहुः प्रेक्ष्य चास्थि महाबलः ।
पादाङ्‍गुष्ठेन चिक्षेप संपूर्णं दशयोजनम् ॥ ६५ ॥
महापराक्रमी रामांनी तुच्छतेने किंचित हसून त्याच्या हाडांचा पूर्ण सांगाडा आपल्या पायाच्या केवळ आंगठ्याने दहा योजने दूर फेकला. ॥ ६५ ॥
बिभेद च पुनस्तालान् सप्तैकेन महेषुणा ।
गिरिं रसातलं चैवं जनयन् प्रत्ययं तदा ॥ ६६ ॥
त्यानंतर सुग्रीवाला आपल्या पराक्रमाची खात्री पटविण्यासाठी श्रीरामांनी एका मोठ्या बाणाने सात तालवृक्ष छेदून टाकले. इतकेच नव्हे तर तोच बाण पर्वताला छिद्र पाडून रसातळात घुसला. ॥ ६६ ॥
ततः प्रीतमनास्तेन विश्वस्तः स महाकपिः ।
किष्किंधां रामसहितो जगाम च गुहां तदा ॥ ६७ ॥
तेव्हां त्या महावानराला विश्वास उत्पन्न होऊन आनंद झाला. नंतर तो श्रीरामांसह किष्किंधेच्या गुहेत गेला. ॥ ६७ ॥
ततोऽगर्जत् हरिवरः सुग्रीवो हेमपिङ्‍गलः ।
तेन नादेन महता निर्जगाम हरीश्वरः ॥ ६८ ॥

अनुमान्य तदा तारां सुग्रीवेण समागतः ।
निजघान च तत्रैनं शरेणैकेन राघवः ॥ ६९ ॥
तेथे जाऊन सोनेरी रंगाच्या वानरश्रेष्ठ सुग्रीवाने मोठी गर्जना केली. ती ऐकून वानरश्रेष्ठ वाली गुहेतून बाहेर आला. तारेला पटवून तिची अनुमती घेऊन तो सुग्रीवाला भिडला. तेथे श्रीरामांनी एका बाणाने त्याला ठार केले. ॥ ६८-६९ ॥
ततः सुग्रीववचनात् हत्वा वालिनमाहवे ।
सुग्रीवमेव तद् राज्ये राघवः प्रत्यपादयत् ॥ ७० ॥
नंतर सुग्रीवाच्या सांगण्यावरून युद्धात वालीला मारून श्रीरामांनी त्याच्या राज्यावर सुग्रीवाला बसविले. ॥ ७० ॥
स च सर्वान् समानीय वानरान् वानरर्षभः ।
दिशः प्रस्थापयामास दिदृक्षुः जनकात्मजाम् ॥ ७१ ॥
वानरराज सुग्रीवाने सर्व वानरांना एकत्र बोलावून सीतेच्या शोधासाठी त्यांना दशदिशांना पाठविले. ॥ ७१ ॥
ततो गृध्रस्य वचनात् संपातेर्हनुमान् बली ।
शतयोजनविस्तीर्णं पुप्लुवे लवणार्णवम् ॥ ७२ ॥

तत्र लङ्‍कां समासाद्य पुरीं रावणपालिताम् ।
ददर्श सीतां ध्यायंतीं अशोकवनिकां गताम् ॥ ७३ ॥
नंतर संपातीच्या सांगण्यावरून बलवान हनुमानाने शंभर योजने रूंद समुद्र ओलांडून रावणाची राजधानी असणार्‍या लंकानगरीत प्रवेश केला. तेथे त्याला अशोकवनात चिंताग्रस्त असलेली सीता दिसली. ॥ ७२-७३ ॥
निवेदयित्वाभिज्ञानं प्रवृत्तिं विनिवेद्य च ।
समाश्वास्य च वैदेहीं मर्दयामास तोरणम् ॥ ७४ ॥
त्याने सीतेला आपली ओळख सांगितली. श्रीरामांची मुद्रिका देऊन कुशल सांगितले. नंतर तिला धीर देऊन अशोकवाटिकेचे उद्यान उध्वस्त करून टाकले. ॥ ७४ ॥
पञ्च सेनाग्रगान् हत्वा सप्त मंत्रिसुतानपि ।
शूरमक्षं च निष्पिष्य ग्रहणं समुपागमत् ॥ ७५ ॥
नंतर हनुमंताने पाच सेनापती आणि सात मंत्रीपुत्रांना मारले. शूर अक्षाचाही वध केला आणि स्वतः बंधन स्वीकारले. ॥ ७५ ॥
अस्त्रेणोन् मुक्तमात्मानं ज्ञात्वा पैतामहाद् वरात् ।
मर्षयन् राक्षसान् वीरो यंत्रिणस्तान् यदृच्छया ॥ ७६ ॥
ब्रह्मदेवाच्या वराने आपण ब्रह्मपाशापासून मुक्त आहोत हे जाणूनही ब्रह्मास्त्राने आपल्याला बांधणार्‍या राक्षसांचा अपराध हनुमानाने स्वेच्छेने सहन केला. ॥ ७६ ॥
ततो दग्ध्वा पुरीं लङ्‍कां ऋते सीतां च मैथिलीम् ।
रामाय प्रियमाख्यातुं पुनरायान् महाकपिः ॥ ७७ ॥
नंतर सीतेचे स्थान वगळून इतर लंकानगरी त्याने जाळून टाकली आणि रामाला सीतेचे कुशल सांगण्यासाठी तो पुन्हा श्रीरामांकडे आला. ॥ ७७ ॥
सोऽभिगम्य महात्मानं कृत्वा रामं प्रदक्षिणम् ।
न्यवेदयदमेयात्मा दृष्टा सीतेति तत्त्वतः ॥ ७८ ॥
अमर्याद बुद्धि आणि शक्तिने युक्त असलेल्या हनुमंताने महात्म्या रामांजवाळ जाऊन त्यांना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला व सीतेचे दर्शन झाल्याचे संगून सर्व वृत्त निवेदन केले. ॥ ७८ ॥
ततः सुग्रीवसहितो गत्वा तीरं महोदधेः ।
समुद्रं क्षोभयामास शरैः आदित्यसन्निभैः ॥ ७९ ॥
नंतर श्रीरामांनी सुग्रीवासह महासागराच्या किनार्‍यावर जाऊन सूर्यासारख्या प्रखर बाणांनी समुद्रास तप्त केले. ॥ ७९ ॥
दर्शयामास चात्मानं समुद्रः सरितां पतिः ।
समुद्रवचनाच्चैव नलं सेतुं अकारयत् ॥ ८० ॥
तेव्हां नदीपती समुद्र मनुष्यरूपात प्रगट झाला. त्याच्या सांगण्यावरून श्रीरामांनी नलाकरवी सेतू बांधून घेतला. ॥ ८० ॥
तेन गत्वा पुरीं लङ्‍कां हत्वा रावणमाहवे ।
रामस्सीतां अनुप्राप्य परां व्रीडां उपागमत् ॥ ८१ ॥
त्यावरून लंकेला जाऊन रावणाला युद्धात ठार केले आणि सीतेला परत आणले. परंतु श्रीरामांना परगृही वास केलेल्या सीतेचा स्वीकार करणे योग्य वाटले नाही. ॥ ८१ ॥
तामुवाच ततो रामः परुषं जनसंसदि ।
अमृष्यमाणा सा सीता विवेश ज्वलनं सती ॥ ८२ ॥
लोकांच्या देखत राम सीतेला फार कठोरपणे बोलले. पतिव्रता सीतेला ते सहन न होऊन स्वतःचे पावित्र्य सिद्ध करण्याकरिता तिने अग्निप्रवेश केला. ॥ ८२ ॥
ततोऽग्निवचनात् सीतां ज्ञात्वा विगतकल्मषाम् ।
कर्मणा तेन महता त्रैलोक्यं सचराचरम् ॥ ८३ ॥

सदेवर्षिगणं तुष्टं राघवस्य महात्मनः ।
बभौ रामः संप्रहृष्टः पूजितः सर्वदैवतैः ॥ ८४ ॥
नंतर अग्निदेवांच्या सांगण्यावरून सीता निष्कलंक आहे असे श्रीरामांना, मुख्यतः ज्यांच्या प्रित्यर्थ श्रीरामांनी सीतेशी कठोर भाषण केले होते, त्या सर्वांना कळले. महात्मा श्रीरामचंद्रांच्या रावणवधाच्या त्या महान् कृत्यामुळे देव, ऋषी यांच्यासह चराचरात्मक सारे त्रैलोक्य संतुष्ट झाले. त्यावेळी सर्व देवगणांनी श्रीरामांची स्तुती केली. तेव्हां श्रीराम प्रसन्नतेने शोभू लागले. ॥ ८२-८४ ॥
अभिषिच्य च लङ्‍कायां राक्षसेंद्रं विभीषणम् ।
कृतकृत्यस्तदा रामो विज्वरः प्रमुमोद ह ॥ ८५ ॥
त्यांनी राक्षसराज बिभीषणाचा लंकेच्या राज्यावर राज्यभिषेक केला. अशा रीतीने अवाअर कार्याचा मुख्य भाग पूर्ण झाल्यामुळे चिंतामुक्त झालेले श्रीराम अतिशय आनंदित झाले. ॥ ८५ ॥
देवताभ्यो वरं प्राप्य समुत्थाप्य च वानरान् ।
अयोध्यां प्रस्थितो रामः पुष्पकेण सुहृद् वृतः ॥ ८६ ॥
नंतर देवांना प्रार्थना करून त्यांच्या करवी मृत वानरांना उठवून सर्व राक्षस-वानर मित्रांसह श्रीराम पुष्पक विमानाने अयोध्येस निघाले. ॥ ८६ ॥
भरद्वाजाश्रमं गत्वा रामः सत्यपराक्रमः ।
भरतस्यांतिके रामो हनूमंतं व्यसर्जयत् ॥ ८७ ॥

पुनराख्यायिकां जल्पन् सुग्रीवसहितस्तदा ।
पुष्पकं तत् समारुह्य नंदिग्रामं ययौ तदा ॥ ८८ ॥
भरद्वाज मुनिंच्या आश्रमात गेल्यावर सत्यपराक्रमी श्रीरामांनी हनुमंताला भरताकडे पाठविले; आणि नंतर सुग्रीवाबरोबर वार्तालाप करीत त्याच पुष्पक विमानात बसून नंदिग्रमात गेले. ॥ ८७-८८ ॥
नंदिग्रामे जटां हित्वा भ्रातृभिः सहितोऽनघः ।
रामः सीतां अनुप्राप्य राज्यं पुनरवाप्तवान् ॥ ८९ ॥
नंदिग्रामात गेल्यावर जटा काढून टाकून पुण्यशील राम सीता आणि बंधु यांच्यासह पुन्हा आपल्या राज्यात आले. ॥ ८९ ॥
प्रहृष्टमुदितो लोकः तुष्टः पुष्टः सुधार्मिकः ।
निरामयो हि अरोगश्च दुर्भिक्षभयवर्जितः ॥ ९० ॥
[या सर्गाच्या सहाव्या श्लोकापासून नारदऋषिंनी रामचरित्र सांगण्यास सुरुवात केली. आता ह्यापुढे त्रिकालज्ञ नारदमुनि पुढील अकरा हजार वर्षांचे भविष्य वर्तवीत आहेत असे पुढील श्लोकांवरून अनुमान करावे लागेल.] त्यांच्या राज्यात प्रजा अतिशय आनंदी, सुखी, संतुष्ट, पुष्ट, अतिशय धार्मिक, निरोगी, दुष्काळादिकांच्या भयापासून मुक्त राहील. ॥ ९० ॥
न पुत्रमरणं किञ्चित् द्रक्ष्यंति पुरुषाः क्वचित् ।
नार्यश्चाविधवा नित्यं भविष्यंति पतिव्रताः ॥ ९१ ॥
कोणालाही पुत्र निधनाचे दुःख किंवा स्त्रियांना पतिनिधनाचे दुःख अनुभवावे लागणार नाही. सर्व स्त्रिया पातिव्रत्याने वागतील. ॥ ९१ ॥
न चाग्निजं भयं किञ्चित् नाप्सु मज्जंति जंतवः ।
न वातजं भयं किञ्चित् नापि ज्वरकृतं तथा ॥ ९२ ॥
प्रजेला अग्नि, पाणी, वारा, ताप, भूक, चोर इत्यादिंपासून भय असणार नाही. नगरे, राज्ये धनधान्याने समृद्ध असतील. ॥ ९२ ॥
न चापि क्षुद्‍भयं तत्र न तस्करभयं तथा ।
नगराणि च राष्ट्राणि धनधान्ययुतानि च ॥ ९३ ॥

नित्यं प्रमुदिताः सर्वे यथा कृतयुगे तथा ।
अश्वमेधशतैरिष्ट्वा तथा बहुसुवर्णकैः ॥ ९४ ॥

गवां कोट्ययुतं दत्त्वा विद्वद्‌भ्यो विधिपूर्वकम् ।
असङ्‍ख्येयं धनं दत्त्वा ब्राह्मणेभ्यो महायशाः ॥ ९५ ॥

राजवंशाञ्छतगुणान् स्थापयिष्यति राघवः ।
चातुर्वर्ण्यं च लोकेऽस्मिन् स्वे स्वे धर्मे नियोक्ष्यति ॥ ९६
॥ कृतयोगांतील लोकांप्रमाणे सर्व लोक नेहमी आनंदी असतील. कीर्तिमान श्रीराम पुष्कळ सुवर्ण दक्षिणेने युक्त शेकडो अश्वमेध यज्ञ करतील. विद्वानांना दहा हजार कोटी गाई आणि ब्राह्मणांना विपुल धन देतील. शेकडो राजवंशांची स्थापना करतील आणि चारही वर्णाच्या लोकांना त्यांच्या त्यांच्या धर्मात स्थापन करतील. ॥ ९३-९६ ॥
दशवर्षसहस्राणि दशवर्षशतानि च ।
रामो राज्यमुपासित्वा ब्रह्मलोकं प्रयास्यति ॥ ९७ ॥
अशा रीतीने अकरा हजार वर्षे राज्य करून श्रीराम ब्रह्मलोकास गमन करतील. ॥ ९७ ॥
इदं पवित्रं पापघ्नं पुण्यं वेदैश्च सम्मितम् ।
यः पठेद् रामचरितं सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ९८ ॥
वेदांसारखे पवित्र, पापनाशक, पुण्यमय असे रामचरित्र जो वाचील तो सर्व् पापांपासून मुक्त होईल. ॥ ९८ ॥
एतद् आख्यानमायुष्यं पठन् रामायणं नरः ।
सपुत्रपौत्रः सगणः प्रेत्य स्वर्गे महीयते ॥ ९९ ॥

पठन् द्विजो वाग् ऋषभत्वमीयात्
स्यात् क्षत्रियो भूमिपतित्वमीयात् ।
वणिग्जनः पण्यफलत्वमीयात्
जनश्च शूद्रोऽपि महत्त्वमीयात् ॥ १०० ॥
ही रामायणकथा वाचणार मनुष्य पुत्रपौत्र व परिवारासह मृत्युनंतर स्वर्गाला जातो. ही कथा ब्राह्मणाने वाचल्यास तो विद्वान होईल. क्षत्रियाने वाचल्यास त्याला राज्याची प्राप्ती होईल. वैश्याने वाचल्यास त्याला व्यापारात भरभराट होईल आणि शूद्राने वाचल्यास त्याला मान मिळेल. ॥९९-१०० ॥
इत्यार्षे श्रीमद्‍ रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये बालकाण्डे प्रथमः सर्गः ॥ १ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील बालकाण्डाचा पहिला सर्ग समाप्त झाला. ॥ १ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

बालकाण्ड - द्वितीयः सर्गः

श्रीमद् वाल्मीकि रामायणे

बालकाण्ड

॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

द्वितीयः सर्गः
रामायणकाव्यस्य उपक्रमः - तमसातटे क्रौञ्चवधात् संतप्तस्य वाल्मीकेः शोकस्य श्लोकरूपतया प्रकटनं ब्रह्मणस्तं प्रति रामचरितमय काव्यनिर्माणार्थं आदेशः रामायणकाव्याचा उपक्रम - तमसेच्या तटावर क्रौञ्चवधाने संतप्त झालेल्या महर्षि वाल्मीकिच्या शोकाचे श्लोकरूपात प्रकट होणे; आणि ब्रह्मदेवांनी त्यांना रामचरित्रमय काव्य निर्माण करण्याचा आदेश देणे -
नारदस्य तु तद्वाक्यं श्रुत्वा वाक्यविशारदः । पूजयामास धर्मात्मा सहशिष्यो महामुनिम् ॥ १ ॥ देवर्षि नारदांचे उपर्युक्त वचन ऐकून वाणीविशारद धर्मात्मा ऋषि वाल्मीकिंनी आपल्या शिष्यांसहित त्या महामुनिंचे पूजन केले ॥ १ ॥
यथावत् पूजितस्तेन देवर्षिः नारदस्तथा ।
आपृछ्यैवाभ्यनुज्ञातः स जगाम विहायसम् ॥ २ ॥
वाल्मीकिंच्याकडून यथावत् सन्मान झाल्यावर देवर्षि नारदांनी त्यांची जाण्यासाठी आज्ञा मागितली आणि त्यांची अनुमति मिळाल्यावर ते आकाश मार्गाने निघून गेले. ॥ २ ॥
स मुहूर्तं गते तस्मिन् देवलोकं मुनिस्तदा ।
जगाम तमसातीरं जाह्नव्यास्त्वविदूरतः ॥ ३ ॥
ते देवलोकाला निघून गेल्यावर दोनच घटकानंतर वाल्मीकि तमसा नदीच्या तटावर गेले. ते स्थान गंगेपासून फारसे दूर नव्हते. ॥ ३ ॥
स तु तीरं समासाद्य तमसाया मुनिस्तदा ।
शिष्यमाह स्थितं पार्श्वे दृष्ट्वा तीर्थं अकर्दमम् ॥ ४ ॥
तमसेच्या तटावर पोहोंचून तेथील घाटावर चिखल नाही असे स्थान पाहून मुनि आपल्या जवळ उभ्या असलेल्या शिष्यास म्हणाले-॥ ४ ॥
अकर्दमं इदं तीर्थं भरद्वाज निशामय ।
रमणीयं प्रसन्नांबु सन्मनुष्यमनो यथा ॥ ५ ॥
'भरद्वाज ! पहा बरे इथला घाट किती सुंदर आहे. यात चिखलाचे नावही नाही. सत्पुरुषाचे मन जसे स्वच्छ असते तसे येथील पाणी किती स्वच्छ आहे. ॥ ५ ॥
न्यस्यतां कलशस्तात दीयतां वल्कलं मम ।
इदं एव अवगाहिष्ये तमसातीर्थमुत्तमम् ॥ ६ ॥
'तात ! येथे कलश ठेवून दे, आणि माझी वल्कले दे. मी तमसेच्या या उत्तम तीर्थामध्ये स्नान करीन. ॥ ६ ॥
एवमुक्ते भरद्वाजो वाल्मीकेन महात्मना ।
प्रायच्छत मुनेस्तस्य वल्कलं नियतो गुरोः ॥ ७ ॥
महात्मा वाल्मीकिंनी असे सांगितल्यावर नियम परायण शिष्य भरद्वाजांनी आपले गुरु मुनिवर वाल्मीकि यांना वस्त्र दिले. ॥ ७ ॥
स शिष्यहस्ताद् आदाय वल्कलं नियतेंद्रियः ।
विचचार ह पश्यंस्तत् सर्वतो विपुलं वनम् ॥ ८ ॥
शिष्याच्या हातातून वल्क घेऊन ते जितेंद्रिय मुनि तेथील विशाल वनाची शोभा पहात सर्वत्र विचरू लागले. ॥ ८ ॥
तस्याभ्याशे तु मिथुनं चरंतं अनपायिनम् ।
ददर्श भगवान् तत्र क्रौञ्चयोः चारुनिःस्वनम् ॥ ९ ॥
त्यांच्याजवळच कधी एकमेकांपासून विलग न होणारे एक क्रौञ्च पक्ष्यांचे जोडपे विचरत होते. ते दोन्ही पक्षी अत्यंत मधुर बोली बोलत होते. भगवान् वाल्मीकिंनी पक्ष्यांच्या जोडप्यास पाहिले. ॥ ९ ॥
तस्मात्तु मिथुनादेकं पुमांसं पापनिश्चयः ।
जघान वैरनिलयो निषादस्तस्य पश्यतः ॥ १० ॥
मुनि असे पहात असतांना, त्याचवेळी पापपूर्ण विचाराने युक्त असलेल्या आणि समस्त जंतूशी अकारण वैर करणार्‍या एका निषादाने तेथे येऊन त्या पक्ष्यांपैकी एकाला, जो नर होता, एका बाणाने मारून टाकले. ॥ १० ॥
तं शोणितपरीताङ्‍गं वेष्टमानं महीतले ।
भार्या तु निहतं दृष्ट्वा रुराव करुणां गिरम् ॥ ११ ॥
तो पक्षी रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडला आणि पंख फडफडवीत तडफडू लागला. आपल्या पतीची हत्या झालेली पाहून त्याची भार्या क्रौञ्ची करुणाजनक आर्तस्वराने चीत्कार करू लागली. ॥ ११ ॥
वियुक्ता पतिना तेन द्विजेन सहचारिणा ।
ताम्रशीर्षेण मत्तेन पत्त्रिणा सहितेन वै ॥ १२ ॥
उत्तम पंखांनी युक्त असलेला तो पक्षी सदा आपल्या पत्‍नीबरोबर हिंडत असे. त्याच्या मस्तकाचा रंग तांब्याप्रमाणे लाल होता; आणि तो कामाने मत्त झालेला होता. अशा पतिचा वियोग झाल्याने ती क्रौञ्ची अत्यंत दुःखाने रडत होती. ॥ १२ ॥
तथाविधं द्विजं दृष्ट्वां निषादेन निपातितम् ।
ऋषेः धर्मात्मनः तस्य कारुण्यं समपद्यत ॥ १३ ॥
निषादाने ज्याला बाण मारून पाडले होते त्या नरपक्ष्याची दुर्दशा पाहून त्या धर्मात्मा ऋषिंना त्याची फार दया आली. ॥ १३ ॥
ततः करुणवेदित्वाद् अधर्मोऽयमिति द्विजः ।
निशाम्य रुदतीं क्रौञ्चीं इदं वचनमब्रवीत् ॥ १४ ॥
स्वभावतः करुणेचा आश्रय असलेल्या ब्रह्मर्षिंनी 'हा अधर्म झाला आहे' अशा निश्चयाने त्या रडणार्‍या क्रौञ्चीकडे पाहून निषादास म्हणाले - ॥ १४ ॥
मा निषाद प्रतिष्ठां त्वं अगमः शाश्वतीः समाः ।
यत् क्रौञ्चमिथुनादेकं अवधीः काममोहितम् ॥ १५ ॥
'निषादा ! तुला नित्य निरंतर कधीही शांति मिळणार नाही; कारण तू या क्रौंचाच्या जोडीमधील कामाने मोहित झालेल्या अशा एकाची, त्याचा काहीही अपराध नसताना तू हत्या केली आहेस.' ॥ १५ ॥
तस्यैवं ब्रुवतश्चिंता बभूव हृदि वीक्षतः ।
शोकार्तेनास्य शकुनेः किमिदं व्याहृतं मया ॥ १६ ॥
असे म्हणून जेव्हा त्यांनी याच्यावर विचार केला तेव्हां त्यांच्या मनात अशी चिंता उत्पन्न झाली की, 'अरे ! या पक्ष्याच्या शोकाने पीडित होऊन मी हे काय बोलून गेलो !' ॥ १६ ॥
चिंतयन् स महाप्राज्ञः चकार मतिमान् मतिम् ।
शिष्यं चैवाब्रवीद् वाक्यं इदं स मुनिपुङ्‍गवः ॥ १७ ॥
असा विचार करीत महाज्ञानी आणि परम बुद्धिमान मुनिवर वाल्मीकि हे एका निश्चयावर येऊन पोहोचले आणि आपल्या शिष्याला या प्रकारे बोलले - ॥ १७ ॥
पादबद्धोऽक्षरसमः तंत्रीलयसमन्वितः ।
शोकार्तस्य प्रवृत्तो मे श्लोको भवतु नान्यथा ॥ १८ ॥
"तात ! शोकाने पीडित होऊन माझ्या मुखातून जे वाक्य बाहेर पडले आहे ते चार चरणांनी आबद्ध आहे. प्रत्येक चरणात बरोबर (म्हणजे आठ आठ) अक्षरे आहेत आणि ते वीणेवरही गायले जाणे शक्य आहे. म्हणून हे वचन श्लोकरूप (अर्थात् श्लोक नामक छंदात आबद्ध काव्यरूप अथवा यशःस्वरूप) व्हावयास हवे, अन्यथा नाही. ॥ १८ ॥
शिष्यस्तु तस्य ब्रुवतो मुनेर्वाक्यं अनुत्तमम् ।
प्रतिजग्राह संतुष्टः तस्य तुष्टोऽभवन् मुनिः ॥ १९ ॥
मुनिंचे हे बोलणे ऐकून त्यांचे शिष्य भरद्वाज यांना फार प्रसन्नता वाटली आणि त्यांनी त्यांचे समर्थ करीत म्हटले, "हो, आपले हे वाक्य श्लोकरूपच झाले पाहिजे." शिष्याच्या या कथनाने मुनिंना विशेष संतोष झाला. ॥ १९ ॥
सोऽभिषेकं ततः कृत्वा तीर्थे तस्मिन् यथाविधि ।
तं एव चिंतयन् अर्थं उपावर्तत वै मुनिः ॥ २० ॥
त्यानंतर त्यांनी उत्तम तीर्थात विधिपूरक स्नान केले आणि त्याच विषयाचा विचार करीत ते आश्रमाकडे परत निघाले. ॥ २० ॥
भरद्वाजः ततः शिष्यो विनीतः श्रुतवान् गुरोः ।
कलशं पूर्णमादाय पृष्ठतोऽनुजगाम ह ॥ २१ ॥
नंतर तो विनीत आणि शास्त्रज्ञ शिष्य भरद्वाज जलाने भरलेला कलश घेऊन आपल्या गुरुजींच्या मागोमाग निघाला. ॥ २१ ॥
स प्रविश्य आश्रमपदं शिष्येण सह धर्मवित् ।
उपविष्टः कथाश्चान्याः चकार ध्यानमास्थितः ॥ २२ ॥
शिष्याबरोबर आश्रमात पोहोचून धर्मज्ञ ऋषि वाल्मीकि आसनावर बसले आणि इतर गोष्टी बोलत होते, तरीही त्यांचे सर्व लक्ष्य त्या श्लोकाकडेच लागले होते. ॥ २२ ॥
आजगाम ततो ब्रह्मा लोककर्त्ता स्वयं प्रभुः ।
चतुर्मुखो महातेजा द्रष्टुं तं मुनिपुङ्‍गवम् ॥ २३ ॥
इतक्यात अखिल विश्वाची उत्पत्ति करणारे, सर्वसमर्थ, महातेजस्वी, चतुर्मुख ब्रह्मदेव मुनिवर वाल्मीकिंना भेटण्यासाठी स्वतः त्यांच्या आश्रमात आहे. ॥ २३ ॥
वाल्मीकिः अथ तं दृष्ट्वा सहसोत्थाय वाग्यतः ।
प्राञ्जलिः प्रयतो भूत्वा तस्थौ परमविस्मितः ॥ २४ ॥
त्यांना पाहताच महर्षि वाल्मीकि तत्परतेने उठून उभे राहिले. ते मन आणि इंद्रियांना ताब्यात ठेवून अत्यंत विस्मित होऊन हात जोडून, काही वेळ काहीच बोलू न शकल्यामुळे गुपचूप उभे राहिले. ॥ २४ ॥
पूजयामास तं देवं पाद्यार्घ्यासनवंदनैः ।
प्रणम्य विधिवच्चैनं पृष्ट्वा चैव निरामयम् ॥ २५ ॥
विस्मय ओसरल्यावर भानावर येऊन त्यांनी पाद्य, अर्घ्य, आसन आणि स्तुति आदिंच्या द्वारा भगवान ब्रह्मदेवांचे यथोचित पूजन केले; आणि त्यांच्या चरणी विधिवत प्रणाम करून त्यांचा कुशल समाचार विचारला. ॥ २५ ॥
अथोपविश्य भगवान् आसने परमार्चिते ।
वाल्मीकये च ऋषये संदिदेशासनं ततः ॥ २६ ॥
भगवान ब्रह्मदेव एका परम उत्तम आसनावर विराजमान झाले आणि वाल्मीकि मुनिंनाही त्यांनी आसन ग्रहण करण्याची आज्ञा दिली. ॥ २६ ॥
ब्रह्मणा समनुज्ञातः सोऽप्युपाविशदासने ।
उपविष्टे तदा तस्मिन् साक्षात् लोकपितामहे ॥ २७ ॥

तद्‍गतेनैव मनसा वाल्मीकिर्ध्यानमास्थितः ।
पापात्मना कृतं कष्टं वैरग्रहणबुद्धिना ॥ २८ ॥

यत् तादृशं चारुरवं क्रौञ्चं हन्याद् अकारणात् ।
ब्र्ह्मदेवांची आज्ञा होताच तेही आसनावर बसले. परंतु त्यावेळी साक्षात् लोकपितामह ब्रह्मदेव समोर बसलेले असूनही वाल्मीकिंचे मन क्रौञ्चासंबंधीच्या घटनेकडे लागलेले होते. ते त्या संबंधीच्या विचारातच मग्न होते. 'ओह ! ज्याची बुद्धी सदा वैरभाव ग्रहण करण्यातच लागलेली असते त्या पापात्मा व्याधाने काहीही अपराध नसता त्या मनोहर कलरव करणार्‍या क्रौञ्च पक्षाचे प्राण घेतले आहेत.' ॥ २७-२८ १/२ ॥
शोचन्नेव मुहुः क्रौञ्चीं उपश्लोकमिमं जगौ ॥ २९ ॥

पुनरन्तर्गतमना भूत्वा शोकपरायणः ।
अशा विचारात असता त्यांनी क्रौञ्चीचा आर्तनाद ऐकून निषादाला लक्ष्य करून जो श्लोक म्हटला होता, तो त्यांनी ब्रह्मदेवांच्या समक्ष परत म्हटला. त्याचे पुनः पठण करताच परत त्यांच्या मनात आपण दिलेल्या शापाच्या अनौचित्या संबंधी विचार आला. तेव्हां ते शोक आणि चिंता यात बुडून गेले. ॥ २९ १/२ ॥
तमुवाच ततो ब्रह्मा प्रहसन् मुनिपुङ्‍गवम् ॥ ३० ॥

श्लोक एवाः त्वया बद्धो नात्र कार्या विचारणा ।
मच्छंदादेव ते ब्रह्मन् प्रवृत्तेयं सरस्वती ॥ ३१ ॥

रामस्य चरितं कृत्स्नं कुरु त्वं ऋषिसत्तम ।
ब्रह्मदेवांनी त्यांची मनःस्थिती जाणली आणि ते हसू लागले, आणि मुनि वाल्मीकिंना या प्र्कारे बोलले. "ब्रह्मन् ! तुमच्या मुखातून निघालेले हे छंदोबद्ध वाक्य श्लोकरूपच होईल. या विषयात तुम्ही दुसरा कुठलाही विचार करता कामा नये. माझ्या संकल्पाने अथवा प्रेरणेनेच तुमच्या मुखातून अशी वाणी निघाली आहे. ॥ ३०-३१ १/२ ॥
धर्मात्मनो भगवतो लोके रामस्य धीमतः ॥ ३२ ॥
v वृत्तं कथय धीरस्य यथा ते नारदात् श्रुतम् ।
'मुनिश्रेष्ठ ! तुम्ही श्रीरामाच्या संपूर्ण चरित्राचे वर्णन करा. परम बुद्धिमान भगवान श्रीराम, संसारात सर्वात श्रेष्ठ धर्मात्मा आणि धीर पुरुष आहेत. तुम्ही नारदांच्या मुखाने जसे ऐकले आहे त्यास अनुसरून त्यांच्या चरित्राचे चित्रण करा. ॥ ३२ १/२ ॥
रहस्यं च प्रकाशं च यद्‌वृत्तं तस्य धीमतः ॥ ३३ ॥

रामस्य सहसौमित्रे राक्षसानां च सर्वशः ।
वैदेह्याश्चैव यद् वृत्तं प्रकाशं यदि वा रहः ॥ ३४ ॥

तच्चाप्यविदितं सर्वं विदितं ते भविष्यति ।
'बुद्धिमान श्रीरामाचा जो गुप्त अथवा प्रकट वृत्तांत आहे; तसेच लक्ष्मण, सीता आणि राक्षसांचे जे संपूर्ण गुप्त अथवा प्रकट चरित्र आहे, ते सर्व अज्ञात असूनही तुला ज्ञात होईल. ॥ ३३-३४ १/२ ॥
न ते वाग् अनृता काव्ये काचिदत्र भविष्यति ॥ ३५ ॥

कुरु रामकथां पुण्यां श्लोकबद्धां मनोरमाम् ।
'या काव्यात अंकित झालेली तुझी कुठलीही गोष्ट खोटी होणार नाही. म्हणून तू श्रीरामचंद्रांची परम पवित्र आणि मनोरम कथा श्लोकबद्ध करून लिही. ॥ ३५ १/२ ॥
यावत् स्थास्यंति गिरयः सरितश्च महीतले ॥ ३६ ॥

तावद् रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति ।
'या पृथ्वीवर जोपर्यंत नद्या आणि पर्वतांची सत्ता राहील, तो पर्यंत या संसारात रामायण कथेचा प्रचार होत राहील. ॥ ३६ १/२ ॥
यावद् रामायस्य च कथा त्वत्कृता प्रचरिष्यति ॥ ३७ ॥

तावद् ऊर्ध्वमधश्च त्वं मल्लोकेषु निवत्स्यसि ।
'जो पर्यंत तू रचलेल्या श्रीरामकथेचा लोकात प्रचार होत राहील, तो पर्यंत तू इच्छेनुसार वर, खाली तसेच माझ्या लोकात निवास करशील." ॥ ३७ १/२ ॥
इत्युक्त्वा भगवान् ब्रह्मा तत्रैवांतरधीयत ।
ततः सशिष्यो भगवान् मुनिर्विस्मयमाययौ ॥ ३८ ॥
असे म्हणून भगवान ब्रह्मदेव तेथेच अंतर्धान पावले. त्यांच्या अशा प्रकारे अंतर्ध्यान होण्याने शिष्यांसह भगवान वाल्मीकि मुनींना फार विस्मय वाटला. ॥ ३८ ॥
तस्य शिष्यास्ततः सर्वे जगुः श्लोकमिमं पुनः ।
मुहुर्मुहुः प्रीयमाणाः प्राहुश्च भृशविस्मिताः ॥ ३९ ॥
त्यानंतर त्यांचे सर्व शिष्य अत्यंत प्रसन्न होऊन वारंवार त्या श्लोकाचे गान करू लागले आणि परम विस्मीत होऊन परस्परास म्हणू लागले - ॥ ३९ ॥
समाक्षरैः चतुर्भिर्यः पादैर्गीतो महर्षिणा ।
सोऽनुव्याहरणाद्‍भूयः श्लोकः श्लोकत्वमागतः ॥ ४० ॥
"आपल्या गुरुदेवा महर्षिंनी क्रौञ्च पक्ष्यांच्या दुःखाने दुःखी होऊन ज्या समान अक्षरे असणार्‍या चार चरणांनी युक्त काव्याचे गान केले होते, तो तर त्यांच्या हृदयांतील शोक होता, परंतु त्यांच्या वाणीद्वारा उच्चारीत होऊन श्लोकरूप झाला. ॥ ४० ॥
तस्य बुद्धिरियं जाता वाल्मीकेर्भावितात्मनः ।
कृत्स्नं रामायणं काव्यं ईदृशैः करवाण्यहम् ॥ ४१ ॥
इकडे शुद्ध अंतःकरणाच्या महर्षि वाल्मीकिंच्या मनात असा विचार आला की मी अशा श्लोकांतच संपूर्ण रामायण काव्याची रचना करीन. ॥ ४१ ॥
उदारवृत्तार्थपदैर्मनोरमैः
तदास्य रामस्य चकार कीर्तिमान् ।
समाक्षरैः श्लोकशतैर्यशस्विनो
यशस्करं काव्यमुदारदर्शनः ॥ ४२ ॥
असा विचार करून उदार दृष्टीच्या त्या यशस्वी महर्षिंनी भगवान श्रीरामचंद्रांच्या चरित्रास धरून हजारो श्लोकांनी युक्त महाकाव्याची रचना केली, जी त्यांचे यश वाढविणारी आहे. यात श्रीरामांच्या उदार चरित्रांचे प्रतिपादन करणार्‍या मनोहर पदांचा प्रयोग केला गेला आहे. ॥ ४२ ॥
तद् उपगत समाससंधियोगं
सममधुरोपनतार्थवाक्यबद्धम् ।
रघुवरचरितं मुनिप्रणीतं
दशशिरसश्च वधं निशामयध्वम् ॥ ४३ ॥
महर्षि वाल्मीकि रचित या महाकाव्यात तत्पुरुष आदि समास, दीर्घ-गुण आदि संधि आणि प्रकृति प्रत्ययाच्या संबंधाचा यथायोग्य निर्वाह झाला आहे. याच्या रचनेत समता (पतत् प्रकर्ष आदि दोषांचा अभाव) आहे. पदांत माधुर्य आहे आणि अर्थांत प्रसाद गुणाची अधिकता आहे. भाविक जनहो ! या प्रकारे शास्त्रीय पद्धतीच्या अनुकूल रचले गेलेल्या या रघुवीर चरित्र आणि रावण वधाच्या प्रसंगाला ध्यान देऊन ऐका. ॥ ४३ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे द्वितीयः सर्गः ॥ २ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील बालकाण्डाचा दुसरा सर्ग समाप्त झाला. ॥ २ ॥
.

Tuesday, March 31, 2009

बालकाण्डे- । प्रथमः सर्गः ।

श्रीमद् वाल्मीकि रामायणे

बालकाण्डे


॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥। प्रथमः सर्गः ।
श्रीमद् वाल्मीकि रामायण
नारदेन वाल्मीकिं प्रति संक्षेपतः श्रीरामचरित्रस्य श्रावणम् - नारदांनी वाल्मीकि मुनिंना संक्षेपाने श्रीरामचरित्र ऐकविणे -
तपः स्वाध्याय निरतं तपस्वी वाग्विदां वरम् । नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्‌गवम् ॥ १ ॥ तपस्वी वाल्मीकिंनी तपस्या आणि स्वाध्यायात मग्न राहणार्‍या, विद्वानात श्रेष्ठ मुनिवर नारदांना विचारले - ॥ १ ॥
को न्वस्मिन् सांप्रतं लोके गुणवान् कश्च वीर्यवान् । धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः ॥ २ ॥ [हे मुने !] या समयी या संसारात गुणवान्, वीर्यवान्, धर्मज्ञ, उपकार जाणणारा, सत्यवक्ता आणि दृढप्रतिज्ञ कोण आहे ? ॥ २ ॥
चारित्रेण च को युक्तः सर्वभूतेषु को हितः । विद्वान् कः कः समर्थश्च कश्चैक प्रियदर्शनः ॥ ३ ॥ आत्मवान् को जितक्रोधो द्युतिमान् कोऽनसूयकः । कस्य बिभ्यति देवाश्च जातरोषस्य संयुगे ॥ ४ ॥ एतद् इच्छाम्यहं श्रोतुं परं कौतूहलं हि मे । महर्षे त्वं समर्थोऽसि ज्ञातुं एवंविधं नरम् ॥ ५ ॥ चारित्र्य संपन्न, सर्व प्राण्यांच्या हितात तत्पर, विद्वान, सामर्थ्यसंपन्न, अत्यंत सुंदर, जितेंद्रिय, क्रोधावर मात केलेला, तेजस्वी, कोणाचाही मत्सर न करणारा, युद्धाच्या वेळी रागावला असता ज्याला देवही भितात, असा पुरुषोत्तम कोण आहे बरे ? हे जाणण्याची मला इच्छा आहे. नव्हे नव्हे फारच उत्सुकता आहे. हे महर्षे, असा पुरुष केवळ आपल्यालाच माहीत असणे शक्य आहे. (कारण आपण सर्वत्र संचार करणारे असून आपल्याला दिव्य दृष्टी आहे). ॥ ३-५ ॥
श्रुत्वा चैतत् त्रिलोकज्ञो वाल्मीकेः नारदो वचः । श्रूयतां इति चामंत्र्य प्रहृष्टो वाक्यमब्रवीत् ॥ ६ ॥ वाल्मीकिचे हे बोलणे ऐकून, 'ऐका' असे म्हणून त्रिलोकज्ञानी नारदऋषि मोठ्या आनंदाने सांगू लागले. ॥ ६ ॥
Table Cell Table Cell
Table Cell Table Cell
Table Cell Table Cell
नारदेन वाल्मीकिं प्रति संक्षेपतः श्रीरामचरित्रस्य श्रावणम् - नारदांनी वाल्मीकि मुनिंना संक्षेपाने श्रीरामचरित्र ऐकविणे - तपः स्वाध्याय निरतं तपस्वी वाग्विदां वरम् ।
नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्‌गवम् ॥ १ ॥
तपस्वी वाल्मीकिंनी तपस्या आणि स्वाध्यायात मग्न राहणार्‍या, विद्वानात श्रेष्ठ मुनिवर नारदांना विचारले - ॥ १ ॥ को न्वस्मिन् सांप्रतं लोके गुणवान् कश्च वीर्यवान् ।
धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः ॥ २ ॥
[हे मुने !] या समयी या संसारात गुणवान्, वीर्यवान्, धर्मज्ञ, उपकार जाणणारा, सत्यवक्ता आणि दृढप्रतिज्ञ कोण आहे ? ॥ २ ॥ चारित्रेण च को युक्तः सर्वभूतेषु को हितः ।
विद्वान् कः कः समर्थश्च कश्चैक प्रियदर्शनः ॥ ३ ॥

आत्मवान् को जितक्रोधो द्युतिमान् कोऽनसूयकः ।
कस्य बिभ्यति देवाश्च जातरोषस्य संयुगे ॥ ४ ॥

एतद् इच्छाम्यहं श्रोतुं परं कौतूहलं हि मे ।
महर्षे त्वं समर्थोऽसि ज्ञातुं एवंविधं नरम् ॥ ५ ॥
चारित्र्य संपन्न, सर्व प्राण्यांच्या हितात तत्पर, विद्वान, सामर्थ्यसंपन्न, अत्यंत सुंदर, जितेंद्रिय, क्रोधावर मात केलेला, तेजस्वी, कोणाचाही मत्सर न करणारा, युद्धाच्या वेळी रागावला असता ज्याला देवही भितात, असा पुरुषोत्तम कोण आहे बरे ? हे जाणण्याची मला इच्छा आहे. नव्हे नव्हे फारच उत्सुकता आहे. हे महर्षे, असा पुरुष केवळ आपल्यालाच माहीत असणे शक्य आहे. (कारण आपण सर्वत्र संचार करणारे असून आपल्याला दिव्य दृष्टी आहे). ॥ ३-५ ॥ श्रुत्वा चैतत् त्रिलोकज्ञो वाल्मीकेः नारदो वचः ।
श्रूयतां इति चामंत्र्य प्रहृष्टो वाक्यमब्रवीत् ॥ ६ ॥
वाल्मीकिचे हे बोलणे ऐकून, 'ऐका' असे म्हणून त्रिलोकज्ञानी नारदऋषि मोठ्या आनंदाने सांगू लागले. ॥ ६ ॥ बहवो दुर्लभाश्चैव ये त्वया कीर्त्तिता गुणाः ।
मुने वक्ष्याम्यहं बुद्ध्वा तैर्युक्तः श्रूयतां नरः ॥ ७ ॥
हे मुने ! आपण जे गुण सांगितले, ते पुष्कळ असून ते सर्व एका ठिकाणी आढळणे कठीण आहे. तरीही या गुणांनी संपन्न पुरुषोत्तम मला माहीत आहे. त्याच्या विषयी मी सांगतो, ऐका. ॥ ७ ॥ इक्ष्वाकुवंश प्रभवो रामो नाम जनैः श्रुतः ।
नियतात्मा महावीर्यो द्युतिमान् धृतिमान् वशी ॥ ८ ॥

बुद्धिमान् नीतिमान् वाग्मी श्रीमान् शत्रुनिबर्हणः ।
विपुलांसो महाबाहुः कंबुग्रीवो महाहनुः ॥ ९ ॥

महोरस्को महेष्वासो गूढजत्रुः अरिंदमः ।
आजानुबाहुः सुशिराः सुललाटः सुविक्रमः ॥ १० ॥

समः समविभक्ताङ्‌गः स्निग्धवर्णः प्रतापवान् ।
पीनवक्षा विशालाक्षो लक्ष्मीवान् शुभलक्षणः ॥ ११ ॥

धर्मज्ञः सत्यसंधश्च प्रजानां च हिते रतः ।
यशस्वी ज्ञानसंपन्नः शुचिः वश्यः समाधिमान् ॥ १२ ॥

प्रजापतिसमः श्रीमान् धाता रिपुनिषूदनः ।
रक्षिता जीवलोकस्य धर्मस्य परिरक्षिता ॥ १३ ॥

रक्षिता स्वस्य धर्मस्य स्वजनस्य च रक्षिता ।
वेदवेदाङ्‍ग तत्त्वज्ञो धनुर्वेदे च निष्ठितः ॥ १४ ॥

सर्वशास्त्रार्थ तत्त्वज्ञः स्मृतिमान् प्रतिभानवान् ।
सर्वलोकप्रियः साधुः अदीनात्मा विचक्षणः ॥ १५ ॥
इक्ष्वाकुवंशात जन्मलेले असे एक पुरुष आहेत. ते लोकांत 'राम' या नावाने प्रसिद्ध आहेत. ते जितेंद्रिय, महापराक्रमी, कांतिमान, धैर्यवान, मनावर ताबा असणारे, बुद्धिमान, नीतिमान, उत्तम वक्ते, सुंदर, शत्रूंवर जय मिळवणारे आहेत. शत्रूंवर त्यांचा ताबा आहे. त्यांचे खांदे रुंद असून बाहू लांब आहेत. त्यांचे हात गुडघ्यापर्यंत पोचतात. मान शंखासारखी असून त्यांचे धनुष्य मोठे आहे. गळ्याखालच्या फासळ्या मांसल असल्याने दिसत नाहीत. मस्तक आणि कपाळ फार सुंदर आहेत. चालणे रुबाबदार आहे. त्यांची उंची यथायोग्य असून सर्व अवयव प्रमाणशीर आहेत. कांति तुकतुकीत असून वक्षःस्थल भरदार आहे. नेत्र विशाल आहेत. ते पराक्रमी असून सौंदर्यसंपन्न आहेत. त्यांच्या शरीरावर सर्व शुभ लक्षणे दिसत आहेत. ते धर्मज्ञ, सत्यप्रतिज्ञ, प्रजाहितदक्ष, कीर्तिमान, ज्ञानी, पवित्र, जितेंद्रिय आणि मन एकाग्र असणारे आहेत. प्रजापतीप्रमाणे प्रजापालक, लक्ष्मीसंपन्न, शत्रु-विनाशक, प्राण्यांचे आणि धर्माचे रक्षण करणारे आहेत. स्वधर्मपालन करणारे, स्वजनांचे रक्षण करणारे, वेद आणि वेदांगे यांचे रहस्य जाणणारे, धनुर्विद्येत पारंगत, सर्व शास्त्रांचा अर्थ व त्यांचे रहस्य जाणणारे, स्मरणशक्ति व प्रतिभा यांनी संपन्न, सर्व लोकांना प्रिय, सज्जन, उदार हृदय असणारे व चतुर आहेत. ॥ ८-१५ ॥ सर्वदाभिगतः सद्‌भिः समुद्र इव सिंधुभिः ।
आर्य सर्वसमश्चैव सदैक प्रियदर्शनः ॥ १६ ॥
नद्या जशा सागराला मिळतात, तसे सज्जन त्यांच्याकडेच येतात. ते सद्‌वर्तनी, सर्वत्र समभाव बाळगणारे असून त्यांचे दर्शन सर्वांना नेहमीच प्रिय वाटते. ॥ १६ ॥ स च सर्वगुणोपेतः कौसल्या नंदवर्धनः ।
समुद्र इव गांभीर्ये धैर्येण हिमवान् इव ॥ १७ ॥

विष्णुना सदृशो वीर्ये सोमवत् प्रियदर्शनः ।
कालाग्निसदृशः क्रोधे क्षमया पृथिवीसमः ॥ १८ ॥

धनदेन समस्त्यागे सत्ये धर्म इवापरः ।
तं एवं गुणसंपन्नं रामं सत्यपराक्रमम् ॥ १९ ॥

ज्येष्ठं श्रेष्ठगुणैर्युक्तं प्रियं दशरथः सुतम् ।
कौसल्येचा आनंद वाढविणारे ते सर्वगुणसंपन्न आहेत. समुद्रासारखे गंभीर, हिमालयासारखे धीर, विष्णूंसारखे पराक्रमी, चंद्रासारखे आल्हाददायक, क्रोध आला असता प्रळयकाळच्या अग्निसारखे, क्षमाशील पृथ्वीसारखे आणि सत्य पालनांत जणू दुसरे धर्मच असे ते आहेत. ॥ १७-१९ १/२ ॥ प्रकृतीनां हितैर्युक्तं प्रकृति प्रियकाम्यया ॥ २० ॥

यौवराज्येन संयोक्तुं ऐच्छत् प्रीत्या महीपतिः ।
तस्याभिषेक संभारान् दृष्ट्वा भार्याथ कैकयी ॥ २१ ॥

पूर्वं दत्तवरा देवी वरं एनं अयाचत ।
विवासनं च रामस्य भरतस्य अभिषेचनम् ॥ २२ ॥
अशा रीतीने सर्वगुणसंपन्न, सत्यपरक्रमी, उत्तमोत्तम गुणांनी युक्त असा आपला प्रिय ज्येष्ठ पुत्र प्रजेच्या कल्याणात तत्पर आहे असे पाहून दशरथ राजाने प्रेमाने त्याला यौवराज्याभिषेक करावयाचे ठवविले. त्याच्या अभिषेकाची तयारी चाललेली पाहून जिला राजाने पूर्वी जे काही मागेल त्यानुसार दोन वर देण्याचे मान्य केले होते त्या राणी कैकेयीने राजाकडे दोन वर मागितले. एका वराने रामास वनवास आणि दुसर्‍याने भरताचा राज्याभिषेक. ॥ १९ १/२-२२ ॥ स सत्यवचनाद् राजा धर्मपाशेन संयतः ।
विवासयामास सुतं रामं दशरथः प्रियम् ॥ २३ ॥
तो राजा सत्यवचनी असल्यामुळे धर्मबंधनात अडकला आणि त्याने आपल्या प्रिय पुत्र रामाला वनवासास पाठविले. ॥ २३ ॥ स जगाम वनं वीरः प्रतिज्ञां अनुपालयन् ।
पितुर्वचन निर्देशात् कैकेयाः प्रियकारणात् ॥ २४ ॥
ते वीर राम पित्याच्या सांगण्यावरून त्यांची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आणि कैकेयीच्या मनासारखे करण्यासाठी वनात गेले. ॥ २४ ॥ तं व्रजंतं प्रियो भ्राता लक्ष्मणोऽनुजगाम ह ।
स्नेहाद् विनयसंपन्नः सुमित्रानंदवर्धनः ॥ २५ ॥

भ्रातरं दयितो भ्रातुः सौभ्रात्रं अनुदर्शयन् ।
राम वनास जाण्यासाठी निघाल्याबरोबर सुमित्रेचा आनंद वाढविणारा, विनयशील, रामाचा लाडका भाऊ लक्ष्मण प्रेमामुळे आपल्या श्रेष्ठ बंधुत्वाचा परिचय देत त्यांच्या मागोमाग निघाला. ॥ २५-२६ १/२ ॥ रामस्य दयिता भार्या नित्यं प्राणसमा हिता ॥ २६ ॥

जनकस्य कुले जाता देवमायेव निर्मिता ।
सर्वलक्षण संपन्ना नारीणां उत्तमा वधूः ॥ २७ ॥

सीताप्यनुगता रामं शशिनं रोहिणी यथा ।
पौरैः अनुगतो दूरं पित्रा दशरथेन च ॥ २८ ॥
श्रीरामांची प्राणाहून प्रिय पत्‍नी सीता नेहमी त्यांचे हित करण्यात तत्पर असे. देवमायेनेच अवतार घेतला असे वाटणारी ती जनक कुळांतील होती. ती सर्व स्त्री लक्षणांनी संपन्न असून स्त्रियांतील सर्वोत्तम स्त्री होती. चंद्रामागोमाग रोहिणी जावी तशी तीही श्रीरामांच्या मागोमाग निघाली. त्यावेळी सर्व नागरिकांनी दूरवर जाऊन त्यांना निरोप दिला. तर पिता दशरथ यांनी आपला सारथी सुमंत्र याला रथ देऊन पाठविले. ॥ २६ १/२-२८ ॥ श्रृङ्‌गवेरपुरे सूतं गङ्‍गाकूले व्यसर्जयत् ।
गुहमासाद्य धर्मात्मा निषादाधिपतिं प्रियम् ॥ २९ ॥
नंतर श्रृंगवेरपुरात गंगेच्या काठी राहणार्‍या प्रिय निषादराज गुहाकडे पोचल्यावर धर्मशील रामांनी सारथ्याला परत पाठविले. ॥ २९ ॥ गुहेन सहितो रामो लक्ष्मणेन च सीतया ।
ते वनेन वनं गत्वा नदीः तीर्त्वा बहूदकाः ॥ ३० ॥

चित्रकूटं अनुप्राप्य भरद्वाजस्य शासनात् ।
रम्यं आवसथं कृत्वा रममाणा वने त्रयः ॥ ३१ ॥

देवगंधर्व सङ्‍काशाः तत्र ते न्यवसन् सुखम् ।
चित्रकूटं गते रामे पुत्रशोकातुरः तथा ॥ ३२ ॥

राजा दशरथः स्वर्गं जगाम विलपन् सुतम् ।
गुह, लक्ष्मण व सीता यांच्यासह श्रीराम एका वनातून दुसर्‍या वनात, या प्रमाणे निघाले. वाटेत पाण्यांनी तुडूंब भरलेल्या नद्या त्यांनी पार केल्या. गुहाला परत पाठवून जाता जाता ते भरद्वाजांच्या आश्रमत पोहोचले. भरद्वाजांच्या सांगण्यावरून ते चित्रकूट पर्वतावर गेले. देवगंधर्वाप्रमाणे असणारे ते तिघे तेथे एक सुंदर कुटी बांधून वनात रममाण होत आनंदाने राहूं लागले. ॥ ३०-३२ १/२ ॥ मृते तु तस्मिन् भरतो वसिष्ठ प्रमुखैः द्विजैः ॥ ३३ ॥

नियुज्यमानो राज्याय नैच्छद् राज्यं महाबलः ।
स जगाम वनं वीरो रामपादप्रसादकः ॥ ३४ ॥
श्रीराम चित्रकूट पर्वतावर गेल्यावर पुत्र शोकाने व्याकुळ झालेला राजा दशरथ, पुत्राची आठवणीने झुरून स्वर्गाला गेला. राजा गेल्यावर वसिष्ठादि ऋषिंनी महाबली भरताला राज्यावर बसवायचे ठरविले पण त्याला राज्यावर बसण्याची इच्छा नव्हती. म्हणून तो वीर श्रीरामांना प्रसन्न करण्यासाठी वनात गेला. ३२ १/२ -३४ ॥ गत्वा तु सुमहात्मानं रामं सत्यपराक्रमम् ।
अयाचद् भ्रातरं रामं आर्यभाव पुरस्कृतः ॥ ३५ ॥

त्वमेव राजा धर्मज्ञ इति रामं वचोऽब्रवीत् ।
रामोऽपि परमोदारः सुमुखः सुमहायशाः ॥ ३६ ॥

न चैच्छत् पितुरादेशाद् राज्यं रामो महाबलः ।
पादुके चास्य राज्याय न्यासं दत्त्वा पुनः पुनः ॥ ३७ ॥

निवर्तयामास ततो भरतं भरताग्रजः ।
स कामं अनवाप्यैव रामपादौ उपस्पृशन् ॥ ३८ ॥

नंदिग्रामेऽकरोद् राज्यं रामागमनकाङ्‍क्षया ।
गते तु भरते श्रीमान् सत्यसंधो जितेंद्रियः ॥ ३९ ॥

रामस्तु पुनरालक्ष्य नागरस्य जनस्य च ।
तत्रागमनं एकाग्रो दण्डकान् प्रविवेश ह ॥ ४० ॥
तेथे गेल्यावर त्याने सत्यपरक्रमी महात्मा बंधु रामांना प्रार्थना केली की,"दादा, आपण धर्म जाणणारे आहात. आपणच राजा व्हावे." उदार अंतःकरण असलेल्या, अत्यंत कीर्तिमान, महाबली रामांनीही वडीलांच्या आज्ञेचे पालन म्हणून प्रसन्न मुखानेच राज्य नाकारून आपल्या पादुका राजसिंहासनावर स्थापन करण्यासाठी ठेव म्हणून भरताच्या स्वाधीन करून पुन्हा पुन्हा त्याची समजूत घालून त्याला परत पाठवले. त्यामुळे त्याची इच्छा पूर्ण झाली नाही. अखेर रामचरणांना स्पर्श करून तो परतला आणि त्यांच्या येण्याची प्रतीक्षा करीत नंदिग्रामांत राहून रज्य करू लागला. भरत परत गेलावर इंद्रियनिग्रही, सत्यप्रतिज्ञ श्रीरामांनी, तेथे वारंवार आपल्याला भेटण्यासाठी लोक येत-जात राहणार, हे लक्षात घेऊन निश्चयपूर्वक दण्डकारण्यात प्रवेश केला. ॥ ३५ -४० ॥ प्रविश्य तु महारण्यं रामो राजीवलोचनः ।
विराधं राक्षसं हत्वा शरभङ्‍गं ददर्श ह ॥ ४१ ॥

सुतीक्ष्णं चाप्यगस्त्यं च अगस्त्यभ्रातरं तथा ।
अगस्त्यवचनात् चैव जग्राहैंद्रं शरासनम् ॥ ४२ ॥

खड्‍गं च परमप्रीतः तूणी चाक्षयसायकौ ।
वसतस्तस्य रामस्य वने वनचरैः सह ॥ ४३ ॥

ऋषयोऽभ्यागमन् सर्वे वधायासुर रक्षसाम् ।
स तेषां प्रतिशुश्राव राक्षसानां तथा वने ॥ ४४ ॥

प्रतिज्ञातश्च रामेण वधः संयति रक्षसाम् ।
ऋषीणां अग्निकल्पानां दण्डकारण्य वासिनाम् ॥ ४५ ॥
कमलनयन श्रीरामांनी त्या घनदाट अरण्यात गेल्यावर प्रथम विराध राक्षसाला मारले. नंतर शरभंग, सुतीक्ष्ण, अगस्त्य आणि अगस्त्यबंधू यांच्या आश्रामात जाऊन त्यांच्या आतिथ्याचा स्वीकार केला, तसेच अगस्त्य मुनिंच्या सांगण्यावरून त्यांचाकडून इंद्र-धनुष्य, तलवार आणि जाच्यातील बाण कधीच कमी होत नाहीत, असे दोन भाते मोठ्या आनंदाने घेतले. त्या वनात ऋषि व इतर लोक यांच्यासह राहात असताना तेथील सर्व अग्निसमान तेजस्वी ऋषी वनात राहणार्‍या असुरांचा व राक्षसांचा वध करण्यासाठी त्यांना विनंति करण्यासाठी आले. तेव्हां श्रीरामांनी युद्धांत राक्षसांना मारण्याचे त्यांना वचन दिले. ॥ ४१ -४५ ॥ तेन तत्रैव वसता जनस्थान निवासिनी ।
विरूपिता शूर्पणखा राक्षसी कामरूपिणी ॥ ४६ ॥
तेथेच राहात असताना त्यांनी जनस्थानात राहणार्‍या, इच्छेनुसार रूपे घेणार्‍या शूर्पणखा नावाच्या राक्षसीला (नाक-कान कापवून) कुरूप केले. ॥ ४६ ॥ ततः शूर्पणखावाक्यात् उद्युक्तान् सर्वराक्षसान् ।
खरं त्रिशिरसं चैव दूषणं चैव राक्षसम् ॥ ४७ ॥

निजघान रणे रामः तेषां चैव पदानुगान् ।
वने तस्मिन् निवसता जनस्थान निवासिनाम् ॥ ४८ ॥

रक्षसां निहतान्यासन् सहस्राणि चतुर्दश ।
ततो ज्ञातिवधं श्रुत्वा रावणः क्रोधमूर्च्छितः ॥ ४९ ॥
नंतर शूर्पणखेच्या सांगण्यवरून खर, त्रिशिरस आणि दूषण असे तीन राक्षस, चौदा हजार राक्षसांचे सैन्य घेऊन श्रीरामांवर चालून आले. त्या वनात राहणार्‍या श्रीरामांनी त्या सर्व राक्षसांचा वध केला. आपले बांधव मारले गेले हे शूर्पणखेकडून ऐकताच रागाने रावणाच्या अंगाचा तिळपापड झाला. ॥ ४७-४९ ॥ सहायं वरयामास मारीचं नाम राक्षसम् ।
वार्यमाणः सुबहुशो मारीचेन स रावणः ॥ ५० ॥
त्यावेळी मारीच नावाच्या राक्षसाकडे त्याने मदत मागितली. तेव्हां मारीचाने रावणाला अनेक प्रकारे समजावून परावृत्त करण्याचा प्रयत्‍न केला. ॥ ५० ॥ न विरोधो बलवता क्षमो रावण तेन ते ।
अनादृत्य तु तद्वाक्यं रावणः कालचोदितः ॥ ५१ ॥

जगाम सहमारीचः तस्याश्रमपदं तदा ।
तेन मायाविना दूरं अपवाह्य नृपात्मजौ ॥ ५२ ॥
"हे रावणा, आपल्याहून सामर्थ्यवान असणार्‍याशी विरोध करणे तुझ्या हिताचे नाही." हे मारीचाचे सांगणे अव्हेरून काळाच्या प्रेरनेने रावण रामाच्या आश्रमाजवळ आला. मायावी मारीचाकरवी (मृगरूप धारण करवून) त्याने राम-लक्ष्मणांना आश्रमापासून दूर नेले. ॥ ५१-५२ ॥ जहार भार्यां रामस्य गृध्रं हत्वा जटायुषम् ।
गृध्रं च निहतं दृष्ट्वा हृतां श्रुत्वा च मैथिलीम् ॥ ५३ ॥

राघवः शोकसंतप्तो विललापाकुलेंद्रियः ।
ततस्तेनैव शोकेन गृध्रं दग्ध्वा जटायुषम् ॥ ५४ ॥

मार्गमाणो वने सीतां राक्षसं संददर्श ह ।
कबंधं नाम रूपेण विकृतं घोरदर्शनम् ॥ ५५ ॥

तं निहत्य महाबाहुः ददाह स्वर्गतश्च सः ।
स चास्य कथयामास शबरीं धर्मचारिणीम् ॥ ५६ ॥

श्रमणां धर्मनिपुणां अभिगच्छेति राघव ।
सोऽभ्यगच्छन् महातेजाः शबरीं शत्रुसूदनः ॥ ५७ ॥
नंतर सीतेला पळवून नेत असता विरोध करणार्‍या जटायूला त्याने घायाळ केले. सीतेला रावणाने पळविले हे ऐकून व त्यामुळे जटायू मरण पावला हे पाहून श्रीराम शोकाकुल होऊन विलाप करू लागले. त्याच स्थितीत त्यांनी जटायूवर अग्निसंस्कार केले आणि ते सीतेच्या शोधासाठी निघाले. तेथे त्यांना डोके नसलेला कबंध नावाचा भयंकर राक्षस दिसला. पराक्रमी रामांनी त्यला मारून अग्नि दिला, तेव्हां दिव्य रूप गंधर्व होऊन तो स्वर्गाला गेला. त्यानेच श्रीरामांना सांगितले की, "हे राघवा, तुम्ही धर्माप्रमाणे वागणार्‍या संन्यासिनी शबरीकडे जा." त्याप्रमाणे शत्रुसंहारक महातेजस्वी श्रीराम शबरीकडे गेले. ॥ ५३-५७ ॥ शबर्या पूजितः सम्यक् रामो दशरथात्मजः ।
पंपातीरे हनुमता सङ्‍गतो वानरेण ह ॥ ५८ ॥
शबरीकडून पूजा स्वीकारून दाशरथी राम पंपासरोवरावर गेले. तेथे हनुमान नामक वानरश्रेष्ठाशी त्यांची भेट झाली. ॥ ५८ ॥ हनुमद्वचनाच्चैव सुग्रीवेण समागतः ।
सुग्रीवाय च तत्सर्वं शंसद् रामो महाबलः ॥ ५९ ॥

आदितस्तद् यथावृत्तं सीतायाश्च विशेषतः ।
सुग्रीवश्चापि तत्सर्वं श्रुत्वा रामस्य वानरः ॥ ६० ॥

चकार सख्यं रामेण प्रीतश्चैवाग्निसाक्षिकम् ।
ततो वानरराजेन वैरानुकथनं प्रति ॥ ६१ ॥

रामाय आवेदितं सर्वं प्रणयाद् दुःखितेन च ।
प्रतिज्ञातं च रामेण तदा वालिवधं प्रति ॥ ६२ ॥
हनुमंताच्या संगण्यावरून महाबलवान श्रीरामांनी सुग्रीवाशी मैत्री करून त्याला आपली सुरुवातीपासून हकीकत, विशेषतः सीतेसंबंधीची वार्ता सांगितली. सुग्रीव वानरानेही ते सर्व ऐकून प्रेमपूर्वक श्रीमाशी अग्निच्या साक्षिने मैत्री केली. नंतर दुःखी वानर राजाने मित्रप्रेमामुळे श्रीरामांना वालीशी वैर उत्पन्न होण्याची सर्व हकीकत सांगितली. तेव्हां श्रीरामांनी वालीवधाची प्रतिज्ञा केली. ॥ ५९-६२ ॥ वालिनश्च बलं तत्र कथयामास वानरः ।
सुग्रीवः शङ्‌कितश्चासीत् नित्यं वीर्येण राघवे ॥ ६३ ॥

राघवप्रत्ययार्थं तु दुंदुभेः कायमुत्तमम् ।
दर्शयामास सुग्रीवो महापर्वत सन्निभम् ॥ ६४ ॥
सुग्रीवाने श्रीरामांच्या सामर्थ्याविषयी शंका वाटून वालीचे प्रचंड सामर्थ्य सांगितले, आणि श्रीरामांना त्याची खात्री पटावी म्हणून वालीने मारलेल्या दुंदुभी राक्षसाचे, मोठ्या प्रवताएवढे प्रचंड शरीर दाखविले. ॥ ६३-६४ ॥ उत्स्मयित्वा महाबाहुः प्रेक्ष्य चास्थि महाबलः ।
पादाङ्‍गुष्ठेन चिक्षेप संपूर्णं दशयोजनम् ॥ ६५ ॥
महापराक्रमी रामांनी तुच्छतेने किंचित हसून त्याच्या हाडांचा पूर्ण सांगाडा आपल्या पायाच्या केवळ आंगठ्याने दहा योजने दूर फेकला. ॥ ६५ ॥ बिभेद च पुनस्तालान् सप्तैकेन महेषुणा ।
गिरिं रसातलं चैवं जनयन् प्रत्ययं तदा ॥ ६६ ॥
त्यनंतर सुग्रीवाला आपल्या पराक्रमाची खात्री पटविण्यासाठी श्रीरामांनी एका मोठ्या बाणाने सात तालवृक्ष छेदून टाकले. इतकेच नव्हे तर तोच बाण पर्वताला छिद्र पाडून रसातळात घुसला. ॥ ६६ ॥ ततः प्रीतमनास्तेन विश्वस्तः स महाकपिः ।
किष्किंधां रामसहितो जगाम च गुहां तदा ॥ ६७ ॥
तेव्हां त्या महावानराला विश्वास उत्पन्न होऊन आनंद झाला. नंतर तो श्रीरामांसह किष्किंधेच्या गुहेत गेला. ॥ ६७ ॥ ततोऽगर्जत् हरिवरः सुग्रीवो हेमपिङ्‍गलः ।
तेन नादेन महता निर्जगाम हरीश्वरः ॥ ६८ ॥

अनुमान्य तदा तारां सुग्रीवेण समागतः ।
निजघान च तत्रैनं शरेणैकेन राघवः ॥ ६९ ॥
तेथे जाऊन सोनेरी रंगाच्या वानरश्रेष्ठ सुग्रीवाने मोठी गर्जना केली. ती ऐकून वानरश्रेष्ठ वाली गुहेतून बाहेर आला. तारेला पटवून तिची अनुमती घेऊन तो सुग्रीवाला भिडला. तेथे श्रीरामांनी एका बाणाने त्याला ठार केले. ॥ ६८-६९ ॥ ततः सुग्रीववचनात् हत्वा वालिनमाहवे ।
सुग्रीवमेव तद् राज्ये राघवः प्रत्यपादयत् ॥ ७० ॥
नंतर सुग्रीवाच्या सांगण्यावरून युद्धात वालीला मारून श्रीरामांनी त्याच्या राज्यावर सुग्रीवाला बसविले. ॥ ७० ॥ स च सर्वान् समानीय वानरान् वानरर्षभः ।
दिशः प्रस्थापयामास दिदृक्षुः जनकात्मजाम् ॥ ७१ ॥
वानरराज सुग्रीवाने सर्व वानरांना एकत्र बोलावून सीतेच्या शोधासाठी त्यांना दशदिशांना पाठविले. ॥ ७१ ॥ ततो गृध्रस्य वचनात् संपातेर्हनुमान् बली ।
शतयोजनविस्तीर्णं पुप्लुवे लवणार्णवम् ॥ ७२ ॥

तत्र लङ्‍कां समासाद्य पुरीं रावणपालिताम् ।
ददर्श सीतां ध्यायंतीं अशोकवनिकां गताम् ॥ ७३ ॥
नंतर संपातीच्या सांगण्यावरून बलवान हनुमानाने शंभर योजने रूंद समुद्र ओलांडुन रावणाची राजधनी असणार्‍या लंकानगरीत प्रवेश केला. तेथे त्याला अशोकवनात चिंताग्रस्त असलेली सीता दिसली. ॥ ७२-७३ ॥ निवेदयित्वाभिज्ञानं प्रवृत्तिं विनिवेद्य च ।
समाश्वास्य च वैदेहीं मर्दयामास तोरणम् ॥ ७४ ॥
त्याने सीतेला आपली ओळख सांगितली. श्रीरामांची मुद्रिका देऊन कुशल सांगितले. नंतर तिला धीर देऊन अशोकवाटिकेचे उद्यान उध्वस्त करून टाकले. ॥ ७४ ॥ पञ्च सेनाग्रगान् हत्वा सप्त मंत्रिसुतानपि ।
शूरमक्षं च निष्पिष्य ग्रहणं समुपागमत् ॥ ७५ ॥
नंतर हनुमंताने पाच सेनापती आणि सात मंत्रीपुत्रांना मारले. शूर अक्षाचाही वध केला आणि स्वतः बंधन स्वीकारले. ॥ ७५ ॥ अस्त्रेणोन् मुक्तमात्मानं ज्ञात्वा पैतामहाद् वरात् ।
मर्षयन् राक्षसान् वीरो यंत्रिणस्तान् यदृच्छया ॥ ७६ ॥
ब्रह्मचेवाच्या वराने आपण ब्रह्मपाशापासून मुक्त आहोत हे जाणूनही ब्रह्मास्त्राने आपल्याला बांधणार्‍या राक्षसांचा अपराध हनुमानाने स्वेच्छेने सहन केला. ॥ ७६ ॥ ततो दग्ध्वा पुरीं लङ्‍कां ऋते सीतां च मैथिलीम् ।
रामाय प्रियमाख्यातुं पुनरायान् महाकपिः ॥ ७७ ॥
नंतर सीतेचे स्थान वगळून इतर लंकानगरी त्याने जाळून टाकली आणि रामाला सीतेचे कुशल सांगण्यासाठी तो पुन्हा श्रीरामांकडे आला. ॥ ७७ ॥ सोऽभिगम्य महात्मानं कृत्वा रामं प्रदक्षिणम् ।
न्यवेदयदमेयात्मा दृष्टा सीतेति तत्त्वतः ॥ ७८ ॥
अमर्याद बुद्धि आणि शक्तिने युक्त असलेल्या हनुमंताने महात्म्या रामांजवाळ जाऊन त्यांना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला व सीतेचे दर्शन झाल्याचे संगून सर्व वृत्त निवेदन केले. ॥ ७८ ॥ ततः सुग्रीवसहितो गत्वा तीरं महोदधेः ।
समुद्रं क्षोभयामास शरैः आदित्यसन्निभैः ॥ ७९ ॥
नंतर श्रीरमांनी सुग्रीवासह महासागराच्या किनार्‍यावर जाऊन सूर्यासारख्या प्रखर बाणांनी समुद्रास तप्त केले. ॥ ७९ ॥ दर्शयामास चात्मानं समुद्रः सरितां पतिः ।
समुद्रवचनाच्चैव नलं सेतुं अकारयत् ॥ ८० ॥
तेव्हां नदीपती समुद्र मनुष्यरूपात प्रगट झाला. त्यच्या सांगण्यावरून श्रीरामांनी नलाकरवी सेतू बांधून घेतला. ॥ ८० ॥ तेन गत्वा पुरीं लङ्‍कां हत्वा रावणमाहवे ।
रामस्सीतां अनुप्राप्य परां व्रीडां उपागमत् ॥ ८१ ॥
त्यावरून लंकेला जाऊन रावणाला युद्धात ठार केले आणि सीतेला परत आणले. परंतु श्रीरामांना परगृही वास केलेल्या सीतेचा स्वीकार करणे योग्य वाटले नाही. ॥ ८१ ॥ तामुवाच ततो रामः परुषं जनसंसदि ।
अमृष्यमाणा सा सीता विवेश ज्वलनं सती ॥ ८२ ॥
लोकांच्या देखत राम सीतेला फार कठोरपणे बोलले. पतिव्रता सीतेला ते सहन न होऊन स्वतःचे पावित्र्य सिद्ध करण्याकरिता तिने अग्निप्रवेश केला. ॥ ८२ ॥ ततोऽग्निवचनात् सीतां ज्ञात्वा विगतकल्मषाम् ।
कर्मणा तेन महता त्रैलोक्यं सचराचरम् ॥ ८३ ॥

सदेवर्षिगणं तुष्टं राघवस्य महात्मनः ।
बभौ रामः संप्रहृष्टः पूजितः सर्वदैवतैः ॥ ८४ ॥
नंतर अग्निदेवांच्या सांगण्यावरून सीता निष्कलंक आहे असे श्रीरामांना, मुख्यतः ज्यांच्या प्रित्यर्थ श्रीरामांनी सीतेशी कठोर भाषण केले होते, त्या सर्वांना कळले. महात्मा श्रीरामचंद्रांच्या रावणवधाच्या त्या महान् कृत्यामुळे देव, ऋषी यांच्यासह चराचरात्मक सारे त्रैलोक्य संतुष्ट झाले. त्यावेळी सर्व देवगणांनी श्रीरामांची स्तुती केली. तेव्हां श्रीराम प्रसन्नतेने शोभू लागले. ॥ ८२-८४ ॥ अभिषिच्य च लङ्‍कायां राक्षसेंद्रं विभीषणम् ।
कृतकृत्यस्तदा रामो विज्वरः प्रमुमोद ह ॥ ८५ ॥
त्यांनी राक्षसराज बिभीषणाचा लंकेच्या राज्यावर राज्यभिषेक केला. अशा रीतीने अवाअर कार्याचा मुख्य भाग पूर्ण झाल्यामुळे चिंतामुक्त झालेले श्रीराम अतिशय आनंदित झाले. ॥ ८५ ॥ देवताभ्यो वरं प्राप्य समुत्थाप्य च वानरान् ।
अयोध्यां प्रस्थितो रामः पुष्पकेण सुहृद् वृतः ॥ ८६ ॥
नंतर देवांना प्रार्थना करून त्यंच्या करवी मृत वानरांना उठवून सर्व राक्षस-वानर मित्रांसह श्रीराम पुष्पक विमानाने अयोध्येस निघाले. ॥ ८६ ॥ भरद्वाजाश्रमं गत्वा रामः सत्यपराक्रमः ।
भरतस्यांतिके रामो हनूमंतं व्यसर्जयत् ॥ ८७ ॥

पुनराख्यायिकां जल्पन् सुग्रीवसहितस्तदा ।
पुष्पकं तत् समारुह्य नंदिग्रामं ययौ तदा ॥ ८८ ॥
भरद्वाज मुनिंच्या आश्रमात गेल्यावर सत्यपराक्रमी श्रीरामांनी हनुमंताला भरताकडे पाठविले; आणि नंतर सुग्रीवाबरोबर वार्तालाप करीत त्याच पुश्पक विमाना बसून नंदिग्रमात गेले. ॥ ८७-८८ ॥ नंदिग्रामे जटां हित्वा भ्रातृभिः सहितोऽनघः ।
रामः सीतां अनुप्राप्य राज्यं पुनरवाप्तवान् ॥ ८९ ॥
नंदिग्रामात गेल्यावर जटा काढून टाकून पुण्यशील राम सीता आणि बंधु यांच्यासह पुन्हा आपल्या रज्यात आले. ॥ ८९ ॥ प्रहृष्टमुदितो लोकः तुष्टः पुष्टः सुधार्मिकः ।
निरामयो हि अरोगश्च दुर्भिक्षभयवर्जितः ॥ ९० ॥
[या सर्गाच्या सहाव्या श्लोकापासून नारदऋषिंनी रामचरित्र सांगण्यास सुरुवात केली. आता ह्यापुढे त्रिकालज्ञ नारदमिनि पुढील अकरा हजार वर्षांचे भविष्य वर्तवीत आहेत असे पुढील श्लोकांवरून अनुमान करावे लागेल.] त्यांच्या राज्यात प्रजा अतिशय आनंदी, सुखी, संतुष्ट, पुष्ट, अतिशय धार्मिक, निरोगी, दुष्काळादिकांच्या भयापासून मुक्त राहील. ॥ ९० ॥ न पुत्रमरणं किञ्चित् द्रक्ष्यंति पुरुषाः क्वचित् ।
नार्यश्चाविधवा नित्यं भविष्यंति पतिव्रताः ॥ ९१ ॥
कोणालाही पुत्र निधनाचे दुःख किंवा स्त्रियांना पतिनिधनाचे दुःख अनुभवावे लागणार नाही. सर्व स्त्रिया पातिव्रत्याने वागतील. ॥ ९१ ॥ न चाग्निजं भयं किञ्चित् नाप्सु मज्जंति जंतवः ।
न वातजं भयं किञ्चित् नापि ज्वरकृतं तथा ॥ ९२ ॥
प्रजेला अग्नि, पाणी, वारा, ताप, भूक, चोर इत्यादिंपासून भय असणार नाही. नगरे, राज्ये धनधान्याने समृद्ध असतील. ॥ ९२ ॥ न चापि क्षुद्‍भयं तत्र न तस्करभयं तथा ।
नगराणि च राष्ट्राणि धनधान्ययुतानि च ॥ ९३ ॥

नित्यं प्रमुदिताः सर्वे यथा कृतयुगे तथा ।
अश्वमेधशतैरिष्ट्वा तथा बहुसुवर्णकैः ॥ ९४ ॥

गवां कोट्ययुतं दत्त्वा विद्वद्‌भ्यो विधिपूर्वकम् ।
असङ्‍ख्येयं धनं दत्त्वा ब्राह्मणेभ्यो महायशाः ॥ ९५ ॥

राजवंशाञ्छतगुणान् स्थापयिष्यति राघवः ।
चातुर्वर्ण्यं च लोकेऽस्मिन् स्वे स्वे धर्मे नियोक्ष्यति ॥ ९६
कृतयोगांतील लोकांप्रमाणे सर्व लोक नेहमी आनंदी असतील. कीर्तिमान श्रीराम पुष्कळ सर्वर्ण दक्षिणेने युक्त शेकडो अश्वमेध यज्ञ करती. विद्वानांना दहा जहार कोटी गाई आणि ब्राह्मणांना विपुल धन देतील. शेकडो राजवंशांची स्थापना परतील आणि चारही वर्णाच्या लोकांना त्यांच्या त्यांच्या धर्मात स्थापन करतील. ॥ ९३-९६ ॥ दशवर्षसहस्राणि दशवर्षशतानि च ।
रामो राज्यमुपासित्वा ब्रह्मलोकं प्रयास्यति ॥ ९७ ॥
अशा रीतीने अकरा हजार वर्षे राज्य करून श्रीराम ब्रह्मलोकास गमन करतील. ॥ ९७ ॥ इदं पवित्रं पापघ्नं पुण्यं वेदैश्च सम्मितम् ।
यः पठेद् रामचरितं सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ९८ ॥
वेदांसारखे पवित्र, पापनाशक, पुण्यमय असे रामचरित्र जो वाचील तो सर्व् पापांपासून मुक्त होईल. ॥ ९८ ॥ एतद् आख्यानमायुष्यं पठन् रामायणं नरः ।
सपुत्रपौत्रः सगणः प्रेत्य स्वर्गे महीयते ॥ ९९ ॥

पठन् द्विजो वाग् ऋषभत्वमीयात्
स्यात् क्षत्रियो भूमिपतित्वमीयात् ।
वणिग्जनः पण्यफलत्वमीयात्
जनश्च शूद्रोऽपि महत्त्वमीयात् ॥ १०० ॥
ही रामायणकथा वाचणार मनुष्य पुत्रपौत्र व परिवारासह मृत्युनंतर स्वर्गाला जातो. ही कथा ब्राह्मणाने वाचल्यास तो विद्वान होईल. क्षत्रियाने वाचल्यास त्याला राज्याची प्राप्ती होईल. वैश्याने वाचल्यास त्याला व्यापारात भरभराट होईल आणि शूद्राने वाचल्यास त्याला मान मिळेल. ॥९९-१०० ॥ इत्यार्षे श्रीमद्‍ रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये बालकाण्डे प्रथमः सर्गः ॥ १ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील बालकाण्डाचा पहिला सर्ग समाप्त झाला. ॥ १ ॥